Margao News : 5 लाखांच्या कामाला 81 लाख रुपये खर्च; सावियो कुतिन्हो यांच्या आरोपातून धक्कादाक खुलासे

सध्याच्या विकास कामांच्या स्थितीबद्दल सरकारकडून माहिती मागावी
Margao
MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

Margao : मडगाव शहरामध्ये कुठेही मोठा विकास झाल्याचे दिसत नाही. शिवाय जी कामे पूर्ण झाली, असे दाखविण्यात आली आहेत. ती एकदम निकृष्ट दर्जाची आहेत, अशा स्थितीत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्य सरकारकडून या कामांबद्दल श्वेतपत्रिका मागावी. जुलै महिन्यांमध्ये विधानसभा अधिवेशन आहे व त्यात मडगाव शहरातील विकास कामांबद्दलचा हा मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

शेजारील मतदारसंघांमध्ये झालेला व होत असलेला विकास दिसत असताना मडगावमध्ये मात्र तो प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही, असेही कुतिन्हो यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निकृष्ट कामांबद्दल मडगावकर आमदार दिगंबर कामत यांच्याकडे बोट दाखविणे, त्यांना जबाबदार धरणे सहाजिकच आहे. स्वतःला शुद्ध म्हणून सिद्ध करण्यासाठी मडगाव शहरामध्ये पूर्ण झालेली व चालू असलेल्या विकास कामांबद्दलची श्वेतपत्रिका, कामांचा दर्जा व सध्याच्या विकास कामांच्या स्थितीबद्दल सरकारकडून माहिती मागावी, असे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी पत्रतकात म्हटले आहे.

Margao
Goa University : एलएलबी प्रवेश घाेळ; चौकशीसाठी समिती नेमली

5 लाखांच्या कामाला 81 लाखांचा खर्च

मडगाव मध्ये सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, जलस्त्रोत, जीसुडा, पाणी पुरवठा, सिवरेज व्यवस्थापन सारख्या व इतर खात्यांकडून करोडो रुपयांची विकासकामे सुरु आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांना त्याची भली मोठी रक्कमही देण्यात आली आहे. मडगावमधील ईएसआय इस्पितळाजवळील नाल्याचे काम जलस्त्रोत खात्यामार्फत केले आहे. हे काम पाच ते सहा लाख रुपयांमध्ये होणे शक्य होते. मात्र, त्यासाठी ८१ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे, असे स्वतः सिव्हिल इंजिनियर असलेल्या सावियो कुतिन्हो यांनी पत्रकात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com