Breast Cancer : धक्कादायक कमी वयात स्‍तन कर्करोग : डॉ. शेखर साळकर

Breast Cancer वर्षाला सुमारे ३०० नवे रुग्ण; लवकर निदान करणे ठरते फायद्याचे
Breast Cancer
Breast CancerDainik Gomantak
Published on
Updated on

Breast Cancer : पणजी, बदलती जीवनशैली, उशिरा लग्ने, अयोग्य आहार, कमी अपत्ये, व्यायामाचा अभाव यामुळे राज्यातील कमी वयातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वर्षाकाठी सुमारे ३०० च्या आसपास नवी प्रकरणे आढळून येत आहेत.

यासाठी लवकर निदान हा एकमेव आणि फायद्याचा उपाय असल्याचे मत ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

डॉ. साळकर म्हणाले, महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग ही आता सामान्य बनत आहे. दरवर्षी सुमारे ३०० नवी प्रकरणे समोर येत आहेत. यात सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे कमी वयात या रोगाचे रुग्ण समोर येत आहेत. ३० ते ५० वयोगटातील ५० टक्के रुग्ण समोर येत आहेत. यासाठी लवकर निदान हा महत्वाचा उपाय आहे.

अलीकडच्या काळात महिलांमध्ये जागृती वाढत असून राज्य सरकारचेही प्रयत्न कामी येत आहेत. १९९० च्या सुमारास कर्करोगाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातील रुग्ण उपचारासाठी येत होते. आता नियमित चाचणीमुळे कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात होत आहे.

सकस आहार घ्यावा

३० वर्षांवरील महिलांनी नियमित मोमोग्राफी चाचणी करून घ्यावी. सरकारच्या स्वस्थ महिला - स्वस्थ गोवा या योजनेअंतर्गत स्तनाच्या कर्करोगाच्या मोफत तपासण्या आणि उपचार केले जातात, याचाही महिलांनी लाभ घ्यावा. आहार फॅटयुक्त न घेता प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे, मिनरल्स असलेल्या भाज्या, ताजी फळे, कडधान्ये, दूध, अंडी, मासे यांचा वापर समतोल प्रमाणात असावा.

नियमित चाचणी, उपचार

महिलांनी ३० वर्षांनंतर नियमित स्तनांची चाचणी करून घ्यावी. राज्य सरकारच्या वतीने या चाचण्या मोफत केल्या जातात. याशिवाय तातडीने त्याचे अहवाल उपलब्ध होतात. लवकर निदान झाल्यास यावर तातडीने उपाययोजना करून रोगमुक्त जीवन जगता येते. उशिरा निदान झाल्यास रोगावर उपचार करणे कठीण बनते.

Breast Cancer
Nature Lover: नैसर्गिक ‘संजीवनी रंग’ बनविणारा अवलिया

महिलांमध्येही जीवनशैलीत बदल झाले आहेत. लग्न उशिरा होत आहेत. कमी मुलांना जन्म दिला जातो त्यामुळे नैसर्गिक स्तनपान कमी होते, याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. काही महिला अविवाहित राहणे पसंत करतात.

याशिवाय महिलांमध्ये जंग फूडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. रेड मिट, पिझ्झा, बर्गर, तेल आणि फॅटयुक्त मांसाहार घेतला जातो. नैसर्गिक व्यायामाचा अभावही मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

- डॉ. शेखर साळकर, कर्करोग तज्ज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com