Shiv Jayanti 2024 : वास्कोत शिवरायांचा जयघोष; विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक

Shiv Jayanti 2024 : आमदार साळकर, आमोणकर यांचा सहभाग
Shiv Jayanti 2024 Keshav Smruti High School
Shiv Jayanti 2024 Keshav Smruti High SchoolDainik Gomantak
Published on
Updated on

Shiv Jayanti 2024 :

वास्को, केशव स्मृती शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वास्को परिसर दुमदुमून सोडला. या मिरवणुकीत शिवप्रेमीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुंडवेल येथील कदंब बसस्थानकावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीला आमदार कृष्णा साळकर यांनी झेंडा दाखवून व श्रीफळ वाढवून सुरवात केली.

यावेळी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर, श्रध्दा महाले, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, दामोदर नाईक, रवींद्र भवन बायणाचे अध्यक्ष जयंत जाधव, केशव स्मृती शाळेचे अध्यक्ष पांडुरंग कोरगावकर,

मुख्याध्यापिका सुषमा कोरगावकर, सहाय्यक मुख्याध्यापिका राजश्री जाधव तसेच पालक व शिक्षक उपस्थित होते. तसेच समारोप सोहळ्यास मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचीही उपस्थिती होती.

यावेळी आमदार कृष्णा साळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे दैवत असून त्यांची जयंती दिमाखात साजरा करणे हे आपले कर्तव्य आहे. आज शिवाजी महाराजामुळे आमची संस्कृती व धर्म सुरक्षित राहू शकला.

Shiv Jayanti 2024 Keshav Smruti High School
Cyber Crime Goa: 1.18 कोटींना गंडा घालणारा केरळात अटकेत; गोवा सायबर क्राईम पोलिसांची मोठी कारवाई

शिवराज्याभिषेकाचे दर्शन

ही मिरवणूक हिरालाल कंपनी, स्वतंत्रपथ मार्गावरून मुरगाव पालिकेकडे आल्यानंतर समारोप झाला. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजामाता आणि इतर पारंपरिक पोशाख परिधान करून शिवराज्याभिषेकाचे दर्शन घडविले.

यावेळी विद्यार्थ्यांचे लेझीम, ढोल ताशा पथकही सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम सादर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com