Siolim
SiolimDainik Gomantak

Siolim News :शिवोलीत उभारणार शिवरायांचा पुतळा

Siolim News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमांचे गुरुवारी दुपारी येथील शिवाजी चौकात तिथीनुसार आयोजन करण्यात आले होते .
Published on

Siolim News :

शिवोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उभारण्यात येणार असून या कामासाठी सर्वधर्मीय बांधवांनी यथायोग्य आर्थिक मदत करण्याचे आवाहन समर्थन संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर यांनी यावेळी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमांचे गुरुवारी दुपारी येथील शिवाजी चौकात तिथीनुसार आयोजन करण्यात आले होते .

आजच्या काळातही शिवरायांच्या विचारांची गरज आहे असे असे मत शिवोलीतील श्री वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरज चोडणकर यांनी केले.

Siolim
Goa Politics: भाजप प्रचारासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातील नेते

शिवोलीतील स्वामी समर्थ मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर, नेहा नीलेश वेर्णेकर यांच्या यजमानपदाखाली शिवोलीत गुरुवारी अश्वारूढ पुतळ्यासाठी पायाभरणी करण्यात आली. यावेळी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, यदुवीर सिमेपुरुषकर, दीपक आगरवाडेकर, नितीन आगरवाडेकर तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

दुशिवप्रेमी, मठाचे पुरोहित तसेच वेर्णेकर दाम्पत्याच्या उपस्थितीत हा पायाभरणी समारंभ पार पडला. शिवाजी चौकात जाहीर सभा घेण्यात आली. सूत्रसंचालन पत्रकार संतोष गोवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन आगरवाडेकर केले. गुडे-शिवोली येथील शिवप्रेमी महिला मंडळाने ढोल ताशावादन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com