Goa Shack: काळजी नको, शॅकना परवाने मिळणारच

Goa Shack: पर्यावरणमंत्र्यांचा दुजोरा नवा सीआरझेड आराखडा नसल्याने झाला होता पेच
Goa Shack Policy
Goa Shack PolicyDainik Gomantak

Goa Shack: सागरी अधिनियमांच्या (सीआरझेड) 2019 च्या अधिसूचनेनुसार किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार केलेला नसला, तरी 2011 च्या आराखड्यानुसार परवाने देणे बंद करा असे राष्ट्रीय किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने न कळवल्याची संधी घेण्याचे गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने ठरवले आहे.

Goa Shack Policy
Colvale Jail: चौकशीविना 4 तुरूंग कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

यामुळेच यंदा शॅकना सीआरझेड अंतर्गत ना हरकत दाखले मिळणार आहेत. पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी याला दुजोरा दिला. हा आराखडा तयार केला नाही, तर पूर्वीच्या आराखड्यानुसार परवाने देण्यास 1 नोव्हेंबरपासून बंदी असेल असे राष्ट्रीय प्राधिकरणाने ठरवले होते. बैठकीतील इतिवृत्तात तशी नोंदही जुलैमध्ये करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाबाबत राज्याला काहीच कळवण्यात आले नाही.

त्यामुळे बंदी लागू होत नाही असा अर्थ काढण्यात आला आहे. प्राधिकरणाकडून बंदीबाबत पत्र येत नाही, तोवर २०११ च्या आराखड्यानुसार परवाने, ना हरकत दाखले आणि परवानग्या देणे सुरूच ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे.

Goa Shack Policy
Goa Ferry Boat: फेरीबोटींच्या शुल्कावरून सरकारची दुटप्‍पी भूमिका

मंत्री काब्राल यांनी सांगितले, की 2024 मध्येच हा आराखडा तयार व्हायला हवा होता. ते काम मागे पडत गेले. यंदा ऑगस्टपर्यंतची मुदत राष्ट्रीय हरित लवादाने दिली होती. त्यात मार्चपर्यंत मुदतवाढ आम्ही राष्ट्रीय प्राधिकरणाकडे मागितली आहे. तीही मिळालेली नाही. नवा आराखडा तयार करताना सुमारे साडेसात हजार आक्षेपांचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. जनसुनावणी दरम्यान जनतेकडून हे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

‘बंदीबाबत केंद्राने कळविलेच नाही’

याबाबत मंत्री काब्राल यांना विचारले असता ते म्हणाले, बंदीबाबतचा निर्णय हा अंतर्गत पत्रव्यवहाराचा भाग आहे. त्याबाबत राज्याला स्पष्टपणे काहीही कळविण्यात आलेले नाही. यास्तव बंदी लागू होत नाही. त्यामुळे शॅकसह इतर प्रकल्पांना २०११ च्या अधिसूचनेतील तरतुदी आणि त्याअनुषंगाने केलेला अहवाल याआधारे सर्व कामकाज नियमितपणे केले जाणार आहे.

नवा आराखडा 2019 च्या अधिसूचनेनुसार तयार केला पाहिजे. आता पुढील वर्षातच तसा आराखडा तयार होईल. चेन्नईच्या संस्थेने 2011 च्या अधिसूचनेनुसार तयार केलेला आराखडा हा योग्य त्या प्रमाणात नाही. त्यामुळे आम्ही 1: 25000 या प्रमाणातील आराखड्याच्या प्रतीची मागणी केली आहे. ती मिळाली की नवा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेता येणार आहे.

- नीलेश काब्राल, पर्यावरणमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com