Corruption Case: लाचखोरीप्रकरणी अटकेत असलेल्या पोलिसांच्या जामिनावर आज सत्र न्यायालयात सुनावणी

Corruption Case: प्राथमिक चौकशीअंती तसेच तक्रारदाराने न्यायालयात यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिस हवालदार संशयित संजय तळकर याला अटक झाली.
Court
Court Dainik Gomantak

Corruption Case: लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या तिघा संशयित पोलिसांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज ( दि. 24) सत्र न्यायालयाने होणार आहे. निलंबित असलेले तिन्ही पोलिस कर्मचारी सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास एसीबी करत असून आणखी काही पोलिसांच्या जबान्या नोंदवण्यात येत असल्याची माहिती सूत्राने दिली.

तेरेखोल किनारपट्टी पोलिस स्थानकाचे तत्कालिन पोलिस निरीक्षक विदेश पिळगावकर, पोलिस हवालदार संजय तळकर व दयाराज ऊर्फ राजू कळंगुटकर यांनी एका पॅरा सेलिंग व्यावसायिकाला दरमहिना 8 हजार रुपये देण्यासंदर्भातची ताकीद दिली होती व ते न दिल्यास व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली होती. यासंदर्भातचा व्हिडिओ चित्रीत करून तक्रारदाराने तो व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई झाली होती. हा व्हिडिओ तपासणीस एसीबीकडे देऊन त्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता.

प्राथमिक चौकशीअंती तसेच तक्रारदाराने न्यायालयात यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिस हवालदार संशयित संजय तळकर याला अटक झाली. त्यानंतर राजू कळंगुटकर याला अटक झाल्यानंतर स्थानकाचे तत्कालिन निलंबित पोलिस निरीक्षक विदेश पिळगावकर याचे नाव पुढे आले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याला अटक झाली आहे. संशयित संजय व दयाराज हे गेल्या दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी काल ठेवण्यात आली होती, ती 24 पर्यंत पुढे ढकलण्यात आली.

Court
Goa Murder Case: अल्पवयीन मुलगी, वृद्ध महिला आणि दोन परप्रांतीय कामगार; गोव्यात 10 दिवसांत चार खून

निलंबित निरीक्षक संशयित विदेश पिळगावकर याला अटक केल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यानेही जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे संजय व दयाराज यांच्या जामीन अर्जावर उद्या 24 रोजी सकाळी, तर विदेश पिळगावकर याच्या अर्जावर उद्या दुपारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com