डिचोली: वेतनाच्या प्रश्नावरुन डिचोलीतील (Bicholim) सेझाचे (Vedanta) कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कंपनीकडून आम्हाला भीक नको, तर आमचे हक्काचे वेतन हवे आहे. अशी जोरदार मागणी कामगारांनी केली आहे. कामगारांचे कायदा सल्लागार ऍड. अजय परब गावकर यांच्या उपस्थितीत सेझा (Vedanta) कंपनीच्या धबधबा येथील फाटका समोरील मैदानावर अस्वस्थ कामगारांची सोमवारी बैठक झाली. कामगारांचे प्रश्न सोडविण्यास लोकप्रतिनिधी आणि सरकार कमी पडत आहे. उलट सरकारकडून खाणमालकांची पाठराखण होत आहे. अशी टीका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कामगारांचे कायदा सल्लागार ऍड.परब गावकर यांनी केली. कामगारांना न्याय मिळाला नाही, तर आगामी निवडणुकीत सरकारला त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कामगारांनीही एकाच सुरात या वक्तव्यास सहमती दर्शवली. (Seja workers in Bicholim, are aggressive in demanding full payment)
कंपनीने टाळेबंद सादर करावा प
मागील मार्च महिन्यापासून सेझाच्या कामगारांना अर्धे वेतन देण्यात येत आहे. हा कामगारांवर अन्याय आहे. मुलांबाळांचा शिक्षण खर्च, बँकांचे कर्ज, संसाराचे ओझे यामुळे आधीच कामगार पुरते संकटात आले आहेत. एकाबाजूने साधनसुविधा उभारण्यासाठी म्हणा किंवा 'कोविड' महामारीमुळे म्हणा कंपनी सरकारला अर्थसाहाय्य करीत आहे. तर दुसऱ्या बाजूने कंपनीकडून कामगारांना वाऱ्यावर टाकण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर क्षुल्लक कारणांवरुन कामगारांची सतावणूक करण्यात येत आहे. सरकारला सोडाच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही कामगारांची दयाच येत नाही. अशी कैफियत कामगारांच्यावतीने ऍड. अजय परब गावकर यांनी मांडली.
रॉयल्टीच्या नावाखाली खनिज वाहतूक करून कंपनीने प्रचंड कमाई केली आहे. तरीदेखील कामगारांचे हक्काचे वेतन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल ऍड. परब गावकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. व्यवस्थापनाच्या दाव्याप्रमाणे कामगारांना पूर्ण वेतन देणे परवडत नसेल, तर कंपनीने मागील दोन वर्षांचा टाळेबंद कामगारांसमोर मांडावा. सरकारनेही यात लक्ष घालावे. अशी मागणीही ऍड. परब गावकर यांनी केली.
कामगारांना प्रतिनिधित्व द्या
खाण महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याबद्दल ऍड. परब गावकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले आहे. तर दुसऱ्याबाजूने खाण महामंडळा ठोस भूमिका जाहीर केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. खाण महामंडळ स्थापन करायचे झाल्यास कामगार प्रतिनिधींना महामंडळात प्रतिनिधित्व द्यावे. अशी मागणीही त्यांनी केली.
एकच कामगार संघटना
डिचोलीत सेझा कामगारांची एकच संघटना अस्तित्वात आहे. असे कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी दोनशेहून अधिक कामगार उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.