Goa: मडगावच्या रवीन्द्र भवनात चतुर्थी नंतरच कार्यक्रमांचे आयोजन शक्य

गोव्यात (Goa) गेल्या दीड वर्षांपासुन कोविड महामारीने गंभीर स्वरुप घेतल्यामुळे हा परिसरात अगदी निरव शांतता पसरली आहे.
Ravindra Bhavan, Goa
Ravindra Bhavan, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: गेल्या अनेक वर्षांपासुन रवीन्द्र भवन (Ravindra Bhavan) हे मडगावचे (Margao) प्रमुख कला व सांस्कृतिक केंद्र बनले आहे. रवीन्द्र भवन मार्फत मडगावकरांना व आसपास परिसरातील लोकांना अनेक चांगली नाटके, संगीताचे कार्यक्रम, तियात्र, प्रदर्शने, चर्चा सत्रे, छोटे मोठे अन्य कार्यक्रमांमध्ये सामिल होण्याची संधी लाभली आहे. रवीन्द्र भवन मधील परिसरच इतका सुशोभीत व आकर्षक आहे की संध्याकाळच्या वेळी येथे पालक आपल्या मुलांना घेऊन किंवा ज्येष्ठ नागरीक वेळ घालविण्यासाठी येत असत. त्यामुळे हा परिसर गजबजुन जात असे. पण गेल्या दीड वर्षांपासुन कोविड महामारीने (Covid-19 Goa) गंभीर स्वरुप घेतल्यामुळे हा परिसरात अगदी निरव शांतता पसरली आहे. कोणतेही कार्यक्रम इथे झालेले नाहीत. (Margao Ravindra Bhavan will start after Chaturthi)

दामू नाईक यांनी अधिकारसुत्रे हातात घेतल्यानंतर सरकारने घातलेली मार्गदर्शक नियम पाळुन थोडा काळा येथे काही कार्यक्रम झाले पण नंतर परत एकदा गेल्या सहा महिन्यात एकही कार्यक्रम झालेला नाही.

आता परिस्थिती हळू हळू पुर्वपदावर येत असल्याने येथे छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार आहे. मात्र पुर्वीप्रमाणे पुर्ण ताकदिचे कार्यक्रम केवळ चतुर्थी नंतरच आयोजित केले जातील. ते सुद्धा परिस्थितीचा अभ्यास करुनच असे रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

Ravindra Bhavan, Goa
Goa: कलम 144 रद्द करावे- गिरीश चोडणकर

मध्यंतरी काही कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले होते. पण एकटा मी काहीच करु शकत नाही. त्यासाठी येथील कर्मचाऱ्यांचे व इतरांचे सहकार्य तेवढेच गरजेचे आहे असेही नाईक यांनी पुढे सांगितले.

गेल्या वर्षभरात रवीन्द्र भवनची आर्थिक आवक शुन्य आहे. पुर्वी तियात्र, नाटके, संस्थांचे कार्यक्रम, शाळा व महाविद्य सहकार्य तेवढेच गरजेचे आहे असेही नाईक यांनी पुढे सांगितले.

गेल्या वर्षभरात रवीन्द्र भवनची आर्थिक आवक शुन्य आहे. पुर्वी तियात्र, नाटके, संस्थांचे कार्यक्रम, शाळा व महाविद्यालयीन स्नेहसंमेलने, पुस्तक प्रकाशन, प्रदर्शनामुळे वर्षाकाठी कमीत कमी एक कोटी रुपयाचा महसुल गोळा होत असे. पण आता हा महसुल येणे बंद असल्याने खर्चाचे प्रमाणही 50 पेक्षा जास्त टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. देखभाल व हाऊसकिपिंग खर्चाला पण कात्री लावण्यात आली आहे. आपण स्वता ऑफिसचे वाहन वापरत नाही किंवा पेट्रोल, डिझेलच्या बिलांची रकमेचा परतावाही स्विकारत नसल्याचे नाईक यांनी सांगितले.

रंगमंचावरील किंवा इतर सभागृहातील यंत्रणेची मात्र अधुन मधुन पाहणी, तपासणी करुन पहावी लागते. जर कार्यक्रम सुरु झाले तर नंतर प्रश्र्न उपस्थित व्हायला नको म्हणुन ते करावे लागते. मात्र सभागृहाची, वातानकुलीन यंत्रणेची दुरुस्ती, रंगरंगोटी किंवा ज्यासाठी जास्त खर्च येईल अशा गोष्टींना हात लावलेला नाही असे नंतर सुत्रांकडुन कळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com