Sawarda Railway Station: सावर्डे रेल्वे स्थानक बदलत आहे रूप! प्रवाशांना मिळणार अद्ययावत सुविधा

South Western Railway Progress: अमृत भारत स्थानक योजनेतून सावर्डे रेल्वे स्थानकावरील सुविधांत सुधारणा करण्याचे ५४ टक्के काम पूर्ण झाले आहे. १५ कोटी ६० रुपये यासाठी अंदाजित खर्च असून आजवर त्यातील ३९.२४ टक्के निधी खर्च करण्यात आल्याची माहिती दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी मुख्यालयातून देण्यात आली आहे.
Sawarda Railway Station
Sawarda Railway Station Dainik Gomantak
Published on
Updated on

Sawarda Railway Station

पणजी: रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्थानक योजनेतून सावर्डे रेल्वे स्थानकावरील सुविधांत सुधारणा करण्याचे ५४ टक्के काम पूर्ण झाले आहे. १५ कोटी ६० रुपये यासाठी अंदाजित खर्च असून आजवर त्यातील ३९.२४ टक्के निधी खर्च करण्यात आल्याची माहिती दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी मुख्यालयातून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत स्थानकासाठी नवी इमारत बांधली असून फलाटावरील छपराची लांबी वाढवली आहे. स्थानकावर दोन सरकते जिने आणि दोन लिफ्ट बसवण्यात येणार आहेत. याशिवाय पादचारी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. स्थानकावरील प्रवासी प्रतीक्षालयात वायफाय सुविधाही प्रदान केली जाणार आहे.

स्थानकात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका बांधत असून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ व दिव्‍यांगस्नेही सुविधाही विकसित करण्यात येत आहेत. प्रवाशांना मार्गदर्शन करणारे फलकही लावणे सुरू केले आहे.

गोवा

Sawarda Railway Station
Goa Crime: बाप रे! सेक्सटॉर्शनच्या पैशांतून उघडले रेस्टॉरंट; चोरट्यांच्या टोळीचा प्रताप

कॅसलरॉक एक्सप्रेस लोंढ्यापर्यंतच धावणार

कॅसल रॉक ते लोंढादरम्यान अभियांत्रिकी काम करण्यात येत असल्याने १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मिरज ते कॅसलरॉक एक्सप्रेस ही लोंढ्यापर्यंतच धावणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com