.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वाळपई, आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीत सहभागी झालेल्या गोव्यातील तरुण वयातील वारकऱ्यांचे परराज्यातील ज्येष्ठ महिला, पुरुष मंडळी पाणी घेऊन पाय धुतात.
पदस्पर्श करून आपले मस्तक या वारकऱ्यांच्या पायावर टेकून नमस्कार करतात, ही बाब खरोखरच श्रद्धेची म्हणावी लागेल. रस्त्यालगत गावांत रांगोळी काढून, रस्ता स्वच्छ करून वारकऱ्यांचे अगदी विठ्ठल नामाच्या गजरात स्वागत केले जात आहे.
सत्तरी तालुक्यातून गेल्या सात-आठ वर्षांपासून वारकरी मंडळी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पायी वारी करीत आहेत. यंदाही त्याच उत्साहाने सत्तरी तालुक्यातून असंख्य वारकरी पंढरपूरला रवाना झाले असून कर्नाटक राज्यातून महाराष्ट्राकडे पोहोचत आहेत.
या वारकरी मंडळींचे तिथे अगदी श्रद्धापूर्वक आणि जल्लोषात स्वागत केले जात आहे. विशेष म्हणजे या वारीत परराज्यातील भाविक मंडळी अगदी मनोभावे गोव्यातील वारकरी मंडळींची सेवा करीत आहेत. सातेरी केळबाय माऊली वारकरी मंडळ, करमळी-बुद्रुक मंडळ पंढरपूरला सातव्या वर्षी वारी करीत आहेत. तसेच उस्ते गावातूनही सातेरी वारकरी मंडळ पायी वारीत सहभागी झाले आहे.
विविध पथके पंढरपुरात
वारकरी सोमनाथ गावस म्हणाले, आमचे भव्य असे स्वागत प्रत्येक गावात पोहोचल्यावर तेथील लोक करतात. त्यामुळे या वारीत अनेक माणसे जोडली गेली आहेत.
त्याचा अत्यानंद वारकरी घेत आहेत. अगदी वयस्क मंडळींची पायाला तेल लावून तेथील लोक सेवा करीत आहेत. रविवार, सोमवारपर्यंत विविध पथके पंढरपुरात दाखल होणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.