Sattari: वाळपईत स्थानिक कामगार मिळेनात! आता परराज्यातील कामगारांवरच शेती अन् बागायतीत कामे विसंबून

Sattari: सत्तरी तालुक्यात दररोज काही ना काही घरगुती, सार्वजनिक कामांचा ओघ वाढलेला आहे.
Sattari | Workers
Sattari | WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

Sattari: सत्तरी तालुक्यात दररोज काही ना काही घरगुती, सार्वजनिक कामांचा ओघ वाढलेला आहे. आजच्या घडीला गावातील कामगार मिळणे कठीण बनले आहेत. कुळागरात, शेती,बागायतीत, बांधकाम, रस्ताकाम ही कामे करणारे स्थानिक मजूर मिळेनात अशी स्थिती आहे. त्यामुळे लोकांना आता परराज्यातील कामगारांवर अवलंबून रहावे लागते आहे.

वाळपई मुख्य बाजारात दररोज आठ वाजता परराज्यातील कामगारांचा महामेळावा भरतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मंगळवार सोडून अन्य बुधवार ते सोमवार असे सहा दिवस सकाळी आठ वाजता हे कामगार मोठ्या प्रमाणावर कामाच्या शोधात बाजारात उभे असतात. कोणी आपल्याला कामासाठी नेणार या प्रतिक्षेत थांबलेले असतात.

Sattari | Workers
Goa Government: 'खाजन' सांतआंद्रेतीलच नव्हे, तर राज्यातील एक प्रमुख विषय असल्याने जमीन पुनरुज्जीवित करणार

सार्वजनिक रस्ता काम, शासकीय आणि खासगी इमारतींचे काम, जलवाहिनी टाकणे, केबल घालण्यासाठी रस्त्यालगत खोदाई काम, घरकाम अशी विविध कामे करणारे कंत्राटदार असतात. हे कंत्राटदार बाजारात थांबलेल्या या कामगारांशी पगाराची बोलणी करून हवे तेवढे कामगार घेऊन जातात. हे कामगार नेहमीच कंत्राटदारांच्या संपर्कात राहतात. सातशे ते हजार रुपये रोजंदारी प्रमाणे हे कामगार सरासरी पगार घेतात.

कामगारांची वाढती रेलचेल

हातात लाल रंगाची पिशवी व त्यात दुपारच्या पोटाची व्यवस्था केलेले जेवणाचे डबे हातात घेऊन, खांद्यावर एखाद्या कामासाठी लागणारे हत्यार घेऊन वाळपई बाजारात रोजचा हा मेळा कामगारांचा असतो. वाळपई येथून वाळपई मुख्य शहर, ग्रामीण भागात अशा कामगारांची रेलचेल वाढली आहे.

‘आओ पात्रांव, कुछ काम है क्या?’

आता तर बागायती कामासाठी देखील या कामगारांना बोलविले जाते. कारण गावात कामगार मिळणे दुर्मिळ झाले आहे. एकूणच दररोज वाळपई बाजारात कामगारांची संख्या वाढत चालली आहे. रस्त्यालगत थांबून गोमंतकीयांना ‘आओ पात्रांव, कुछ काम है क्या?’ अशा भाषेत ते विचारणा करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Illegal Night Clubs
Goa Parra Road
Sattari waterfall drowning case
Goa Fishing Season
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com