Sattari News : सत्तरीत माकडतापाचे तीन महिन्यांत ३ रुग्ण

Sattari News : काजू मौसम सुरू झाल्याने रानात माकडापासून हा संसर्ग पसरण्याची भीती असते. त्यामुळे लोकांनी जंगल, काजू बागायतीत जाताना काळजी घ्या आहे. ताप आल्यास दुर्लक्ष करू नका.
Sattari
Sattari Dainik Gomantak

Sattari News :

वाळपई, सत्तरीत पुन्हा एकदा माकडतापाने डोके वर काढले आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत या भागात ३ रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागासह स्थानिकांत एकच खळबळ उडाली आहे.

मात्र, सध्यस्थितीत त्या तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर त्यांना घरी पाठवले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने हिवरे, गोळावलीत जनजागृती मोहीम राबवली आहे.

माकड तापाला ‘केसनूर फॉरेस्ट डीसीज’ असेही म्हणतात. हा रोग प्रामुख्याने जंगली भागात माकड, लंगूर आणि बोनेट मकाक यांना संक्रमित पिसवांच्या चाव्यांद्वारे पसरतो. जेव्हा संक्रमित माकडे जंगली भागात फिरतात तेव्हा ते पिसवांद्वारे विषाणू पसरतात.

सध्या काजूचा हंगाम सुरु झाल्याने माकड ताप वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

Sattari
CVoter Survey Goa: भाजप का काँग्रेस, गोव्यात लोकसभेला कोण जिंकणार? सी-व्होटर सर्व्हे काय सांगतो?

..तातडीने उपचार घ्या

माकडतापाचे तीन महिन्यात तीन रुग्ण सापडल्याने व काजूचा हंगाम सुरू झाल्याने वाळपई सामाजिक इस्पितळातर्फे हिवरे व गोळावली गावात जाऊन कर्मचारी वर्गातर्फे घराघरात जाऊन माकड तापाविषयी जनजागृती करत आहेत. तसेच गैरसमज न बाळगता ताप आल्यास तातडीने उपचार घ्यावेत,असे आवाहनही करण्यात आले आहे.

काजू मौसम सुरू झाल्याने रानात माकडापासून हा संसर्ग पसरण्याची भीती असते. त्यामुळे लोकांनी जंगल, काजू बागायतीत जाताना काळजी घ्या आहे. ताप आल्यास दुर्लक्ष करू नका.

-डाॅ. विकास नाईक, वाळपई सामाजिक इस्पितळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com