Goa Agriculture : आधुनिक बागायतीला ‘कल्लीची’ साथ ; सत्तरीत पारंपरिक सिंचन पध्दत वापरात

Goa Agriculture : विशेषतः सत्तरी तालुक्यातील बागायतदार सुपारीवर जास्त लक्ष केंद्रीत करतो. बारमाही कष्ट करून सुपारी, केळी, नारळ पीक घेतो. या पिकासाठी लागणारा महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी नसेल तर पीक होणार नाही.
Goa Agriculture
Goa Agriculture Dainik Gomantak

पद्माकर केळकर

Goa Agriculture :

वाळपई ,कुळागरे म्हटली की सुपारी, केळी, अननस, मिरी, नारळ, जायफळ इत्यादी पिके नजरेस पडतात.

विशेषतः सत्तरी तालुक्यातील बागायतदार सुपारीवर जास्त लक्ष केंद्रीत करतो. बारमाही कष्ट करून सुपारी, केळी, नारळ पीक घेतो. या पिकासाठी लागणारा महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी नसेल तर पीक होणार नाही. पिकांना पाणी देण्यासाठी पूर्वापारपणे लोक पारंपरिक सिंचन पध्दतीचा वापर करीत आले आहेत.

बदलत्या काळात तुषार सिंचन, ठिबक सिंचन पध्दती नावारुपाला आल्या. बागायतदार त्याचा स्वीकार करीत बागायतीत यंत्रणा कार्यान्वित केली आहे. असे असले तरीही आजही काही बागायतदरांनी पारंपारिक सिंचनाचा वापर करीत आहेत. सत्तरी तालुक्यात तुषार सिंचन पध्दत अधिक प्रमाणात वापरली जात आहे.

त्यातून सिंचनाकरिता बागायतदार वर्गाला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. पण असे असले तरीही पारंपरिक सिंचन पध्दतीत ‘कल्ली’ या लाकडी साधनाचा वापर केला जात आहे. त्याची साथही मोठीच म्हणावी लागेल. कारण ज्यावेळी आधुनिक सिंचन पध्दती विकसित झालेल्या नव्हत्या किंबहूना सत्तरी सारख्या ग्रामीण भागात पोहचल्या नव्हत्या.

Goa Agriculture
Goa Cashew Farmers: काजू उत्पादनात घट! राज्यातील शेतकरी चिंतातुर, हमीभाव वाढवण्याची मागणी

त्यावेळी सर्वजण या ‘कल्ली’ चा वापर करूनच बागायतीत सिंचन करीत होता. आजही मोजकेच बागायतदार या पारंपरिक पध्दतीचा वापर करताना दिसतात. पाटाव्दारे तळीत साठवलेले पाणी मागांमध्ये प्रवाहीत करून पिकाला पाणी दिले जाते. पूर्वापार चालत आलेली ही सिंचन पध्दत शारिरीक व्यायामही घडवते.त्यामुळे त्याची साथ आजही काहींनी सोडलेली नाही.

‘कल्ली’ ने आजवर दिली साथ लाख मोलाची !

आपण गेली पन्नास वर्षेहून अधिक काळ पारंपरिक पद्धतीने बागायतीत पिकांना पाणी देतो. पहाटे ४.३० ते सकाळी ७ पर्यंत हे काम करतो. या पध्दतीत कुळागरात तणांचीही वाढ कमी होते. हे ‘कल्ली’ साधन अत्यंत टिकाऊ, त्यामुळे या कल्ल्यांची जपणूक केली आहे.

मुबलक पाण्याच्या उपलब्धतेतही काटकसरीने पाणी वापरून कल्ली हे साधन बागायतदारांचे मित्रच बनलेले आहे. डिसेंबर ते मे पर्यंत ६० ते ६२ वेळा पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. ‘कल्ली’ने दिलेली साथही लाख मोलाची आहे,असे संजय केळकर (धावे सत्तरी) यांनी सांगितले.

आपली सुमारे साडेचारशे सुपारीची झाडे आहेत. त्यात नवे पिक आहे. गेली दहा वर्षे झाली नवीन जागेत उत्पन्न घेतले असून आपण मातीचे पाट बांधून पाटाव्दारे पाणी आणून कल्लीने पिकांना सिंचन करतो. पारंपारिकमुळे बागायतीत थंडगारपणा कायम रहातो. जमिनीत हळूहळू पाणी जिरून पिकांना मिळते. तण कमी येते. व कामाचा खर्चही कमी होतो.

-बाबाजी राणे, कुडशे धारखंड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com