Sasashti News : सासष्टीत युवावर्गही उतरला शेतीत : पेरणी सुरू

Sasashti News : पूर्वजांची कृषी परंपरा टिकवण्याची धडपड
Sasashti
Sasashti Dainik Gomantak
Published on
Updated on

Sasashti News :

फातोर्डा, पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असल्याने सासष्टीत शेतकऱ्यांनी आपले शेत कसायला सुरुवात केली आहे, यात युवावर्गही उमेदीने भाग घेत आहे.

नावेली, राय, कुडतरी येथील शेतकरी आपली शेत जमीन कसायला शेतीत उतरले असून पेरणी करत आहेत. आपल्या पूर्वजांची परंपरा कायम ठेवण्यासाठी नवयुवक आपला व्यवसाय व नोकरी सोडून पावसाळ्यात स्वतःच्या शेतीत राबत आहेत.

मानवी जीवनात शेती हा खूप महत्त्वाचा घटक आहे. शेतीसाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे घटक होत. एखाद्या विभागात कोणते पीक येऊ शकेल, हे या नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते आणि याची माहिती पूर्व काळापासून शेतीत राबविलेल्यांना असते.

Sasashti
Goa Todays Update News: कळंगुट पोलिसांची छापेमारी, 46,000 च्या हेरॉईनसह एकाला अटक

म्हणून उतरलो शेतीत

१ या विषयी माहिती देताना कुडतरी येथील २२ वर्षीय डियागो फर्नांडिस याने सांगितले की, मागील सात वर्षांपासून आई वडिलांसोबत शेतीत जात होतो. त्यावेळी केवळ शेतात

कसे काम करायचे याची माहिती नव्हती, आता आई वडिलांकडून शेतीचे काम होत नाही. त्यामुळे शेतीचे अस्तित्व जपण्यासाठी शेतीत जावे लागत आहे.

२ राय येथील अन्य एक युवक डेस्मंड डायस या युवकाने सांगितले, या ठिकाणी आमच्या पूर्वजांची शेती आहे. या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी सिंचनासाठी पाणी मिळाल्यास भाजीची लागवड करण्यात येते, त्यानंतर पावसाळ्यात रोपण करण्यात येते याची सुरुवातही करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com