Sports Festival : सर्वण सरकारी प्राथमिक शाळेचा क्रीडा महोत्सव

Sports festival : अन्य मान्यवरांत पालक-शिक्षक संघ अध्यक्ष स्नेहल सावंत, डॉ. एन. सी. सावंत, मुख्याध्यापिका संचिता फाळकर आदींचा समावेश होता.
Sports festival
Sports festival Dainik Gomantak

Sports festival :

डिचोली, सर्वण येथील सरकारी प्राथमिक शाळेचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू राम धावस्कर उपस्थित होते.

अन्य मान्यवरांत पालक-शिक्षक संघ अध्यक्ष स्नेहल सावंत, डॉ. एन. सी. सावंत, मुख्याध्यापिका संचिता फाळकर आदींचा समावेश होता.

क्रीडाज्योत प्रज्वलीत केल्यानंतर मुलांनी उत्कृष्टपणे संचलन केले. यावेळी घेण्यात आलेल्या मैदानी खेळांनी मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

Sports festival
Goa Politics: रेड्डीने दिलेले 60 कोटी भाजपने गोवा निवडणुकीत वापरले

पालकांसह ग्रामस्थांनी या क्रीडा महोत्सवाचा आस्वाद घेतला. संचिता फाळकर यांनी स्वागत केले तर सुमिता फडते यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षकांसह पालकांनी सहकार्य केले.

मैदानी खेळांमुळे शरीर तंदुरुस्त राहते, बुद्धी तल्लख बनते. लहानपणापासूनच मुलांनी अभ्यासाबरोबर खेळांकडे लक्ष द्यावे. त्‍याचा भविष्‍यात मुलांना खूप फायदा होतो आणि ती स्‍वावलंबी बनतात.

- राम धावस्कर, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com