गोव्याच्या 'ओरबिन' ला ‘सरफोजी राजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’

गजानन देसाईंना मिळालेला हा पुरस्कार गोमंतकीयांसाठी अभिमानाचा विषय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
ओरबिन
ओरबिनDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: गजानन देसाई यांच्या बहुचर्चित ‘ओरबिन’ या कादंबरीला प्राप्त झालेला 2020 सालचा, महाराष्ट्र शासनाचा ‘सरफोजी राजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’, त्यांना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. हा पुरस्कारप्रदान सोहळा ‘साखळी रवींद्र भवन’च्या सभागृहात पार पडला. रोख रक्कम एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अधिकारी रणजीत दौंडकर उपस्थित होते.

ओरबिन
राजस्थान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय: खाण घोटाळेबहाद्दरांना दणका

गजानन देसाईंची ‘ओरबिन’ ही कादंबरी खाणव्याप्त परिसरातील सद्यकालीन वास्तवतेचे चित्रण करते. अमर्याद खाण व्यवसायामुळे गोव्यातल्या समाजजीवनावर तसेच पर्यावरणावर झालेल्या दुष्परिणामाचे चित्रण या कादंबरीत करण्यात आले आहे. खाणव्याप्त परिसरातील लोकसमुदायाच्या मानसिकतेवर कादंबरीकाराने नेमके बोट ठेवले आहे. तसेच भविष्यकालीन परिस्थितीचे यथार्थ सूचनही केले आहे. भविष्यात संपूर्ण गोवा खनिजयुक्त आणि प्रदूषणयुक्त ‘ओरबिन’च बनेल असा भयमुक्त संकेत ही कादंबरी देते.

ओरबिन
गोव्यात 15 मार्चपासून व्‍याघ्रगणना

‘ओरबिन’ला यापूर्वी ‘माय मराठी प्रतिष्ठान’, ‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ’, ‘मराठी वाङमय परिषद’, ‘मराठी साहित्य प्रतिष्ठान’ या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा महाराष्ट्र शासनाने मुंबई येथे भव्य स्वरूपात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित न करता, आपल्या अधिकाऱ्यांना पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या गावी पाठवून, त्यांना पुरस्कार बहाल केला. गजानन देसाईंना मिळालेला हा पुरस्कार गोमंतकीयांसाठी अभिमानाचा विषय असल्याचे प्रतिपादन गोवा सरकारच्यावतीने मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com