Sao Jose De Areal: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वाद! धक्काबुकीचा प्रसंग 27 संशयितांवर आरोपपत्र दाखल

Shivaji maharaj statue controversy: स्थानिकांच्या दाव्यानुसार याबाबत पंचायतीकडून परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तसेच ज्या जागेवर पुतळा बसवायचा होता त्याठिकाणी जाण्यासाठी वाटही नव्हती.
Court Order
CourtCanva
Published on
Updated on

मडगाव: सां जुझे दी आरियाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविताना झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुन्हा नोंद झालेल्या २७ संशयितांवर मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपपत्र दाखल केले असून गुरुवारी संशयितावर न्यायालयाने या सर्व संशयितांना आरोपपत्राची प्रत दिली.

या खटल्याची पुढील सुनावणी ९  सप्टेंबर रोजी होणार आहे. २०२४ साली १८ व १९ फेब्रुवारीला सां जुझे दी आरियाल येथे पुतळा बसवला होता.

स्थानिकांच्या दाव्यानुसार याबाबत पंचायतीकडून परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तसेच ज्या जागेवर पुतळा बसवायचा होता त्याठिकाणी जाण्यासाठी वाटही नव्हती. हा पुतळा बसविण्यामागे काही वेगळाच हेतू होता.

Court Order
Sao Jose De Areal: रेल्‍वेमुळे शेती नष्‍ट हाेते, जनावरे मरतात; सां जुझे द आरियल ग्रामस्थांचा स्‍थानकाला विरोध

पुतळा उभारल्यानंतर मंत्री सुभाष फळदेसाई हे तेथे येऊन परत जात असताना त्यांना धक्काबुकीचा प्रसंग घडला होता. नंतर या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद होऊन संशयितांवर गुन्हा नोंद झाला होता. फ्रेडी त्रावासो यांनी सांगितले की, पोलिसांनी सां जुझे दी आरियालमधील २६  स्थानिकांवर, एका गावाबाहेरील व्यक्तीवर अशा एकूण २७  जणांवर गुन्हे नोंद केले.

Court Order
Sao Jose De Areal: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सां जुझे दी आरियालमध्ये पुन्हा वाद; कुंपण तोडल्यावरुन शिवप्रेमी ग्रामस्थ आमने सामने

स्थानिक, लोकप्रतिनिधींवर गुन्हे नोंदवणे गैर

दरम्यान, पोलिसांनी कोणत्याही चौकशीविना स्थानिकांवर व लोकप्रतिनिधींवर गुन्हे नोंद केलेले आहेत. सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतात. लोकांचे प्रश्न असल्यास त्यांनी बोलावल्यानंतर जाणे हे कर्तव्य असते असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हे नोंद करणे हे गैर आहे. आता स्थानिकांवर गुन्हे नोंद करत मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यावर कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे. न्यायालयावर विश्वास असून न्याय नक्कीच मिळेल, असे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com