Santacruz Panchayat
Santacruz PanchayatDainik Gomantak

Santacruz: सांताक्रुझ पंचायतीत 2.96 लाखांचा घोटाळा! कचरा कामगार वेतनात होतेय फसवणूक; तक्रारीकडे दुर्लक्ष

Santacruz Panchayat: कचरा संकलन कामासाठी मंजूर केलेल्या निधीतून दरमहा सुमारे २.९६ लाख रुपये हडपले जात आहेत त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. या संदर्भातची सविस्तर माहिती दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.
Published on

पणजी: सांताक्रुझ पंचायत परिसरातील घरोघरी कचरा संकलनाच्या नावाखाली दरमहा २.९६ लाख रुपयांचा घोटाळा पंचायतीमध्ये होत असल्याची तक्रार इनासिओ डॉमनिक पेरेरा याने दक्षता खात्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकांकडे दाखल केली आहे.

याप्रकरणी यापूर्वी विभागाच्या निरीक्षकांकडे महिन्यापूर्वी तक्रार दखल करूनही कोणतीच दखल घेतली नसल्याचे नमूद केले आहे. या पंचायतीकडून कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या नावावर दाखवण्यात आलेल्या वेतनापैकी त्यातील काही पैसे त्यांच्या वेतनातून काढून त्यांची फसवणूक केली जात आहे.

Santacruz Panchayat
Santa Cruz Worker: कचरा गोळा करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात; मानवी आयोगाची बीडीओ, पंचायत सचिवांना नोटीस

कचरा संकलन कामासाठी मंजूर केलेल्या निधीतून दरमहा सुमारे २.९६ लाख रुपये हडपले जात आहेत त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. या संदर्भातची सविस्तर माहिती व पुरावे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. या पंचायतीमध्ये ठेवण्यात येत असलेला कामगारांचा बोगस हजेरीपट, त्याच्या छायाप्रती, आर्थिक नोंदीतील तफावत व स्टेटमेंटचा त्यामध्ये समावेश आहे.

Santacruz Panchayat
Santa Cruz: सांताक्रुझमध्ये बनावट मजुरांची यादी, सहीच्या ठिकाणी अंगठा केल्याने शंका ; पंचसदस्यांकडून भ्रष्टाचाराची तक्रार दाखल

तक्रारीमध्ये केलेल्या आरोपांसह प्राथमिक चौकशी किंवा तपास करण्यात यावा. चौकशी सुरू केल्यास त्याचा माहिती तक्रारादाराला द्यावी. या घोटाळामध्ये गुंतलेल्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जावी. कचरा संकलन करणाऱ्या कामगारांची माहिती मिळवून त्यांच्या जबान्या नोंदवल्यास सत्य बाहेर येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com