Sanjivani Sugar Factory : कारखान्याच्या निवासी गाळ्यांना हवी ‘संजीवनी’; बंदमुळे स्थिती बिकट

सरकारने डागडुजी करून भाडेतत्त्वावर द्यावेत
Sanjivani Sugar Factory
Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak

Sanjivani Sugar Factory : संजीवनी साखर कारखान्याचा निवासी गाळ्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली असून त्यांना डागडुजीची गरज आहे. हे सर्व निवासी गाळे सरकारने दुरुस्ती करून भाडेपट्टीवर द्यावेत, अशी मागणी स्थानिक लोक करीत आहेत. प्राप्त माहिती नुसार काही निवासी गाळे व्यवस्थित असून मागील अनेक वर्षापासून संजीवनीचे कामगार राहत आहेत. कारखाना जेव्हा जोरात सुरू होता, तेव्हा या सर्व निवासी गाळ्यांमध्ये कामगार रहात होते.

तेव्हा सरकारच्या तिजोरीत भाडेस्वरूपात मोठ्या प्रमाणात महसूलही जमा होत होता. पण काही वर्षांपासून कारखाना बंद असल्याने या निवासी गाळ्यांची स्थिती बिकट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. या संदर्भात प्रशासक सत्तेज कामत म्हणाले, की या ठिकाणी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे एकूण १८४ निवासी गाळे आहेत.

त्यापैकी ६० गाळे सुस्थितीत असून हे गाळे विविध लोकांना भाडेपट्टीवर दिलेले आहेत. २० निवासी गाळे कायम असलेल्या कामगारांना भाडेपट्टीवर दिलेले आहेत. १० निवासी गाळे निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत तर तीन गाळे दुकानांसाठी दिलेले आहेत. कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांना १० गाळे व बाहेरील व्यक्तींना राहण्यासाठी १० गाळे दिले आहेत. कारखाना बंद असल्याने सरकारचे उत्पन्नही थांबले आहे. गाळे भाड्याने दिल्यास त्यातून महसूल मिळू शकतो.

Sanjivani Sugar Factory
Goa Monsoon Update: राज्यात पावसाचे थैमान, मडगाव आरोग्य केंद्राचा काही भाग कोसळला आणि...

पार्किंग हबची संजीवनीला प्रतीक्षा

संजीवनीच्या २ लाख चौरस मीटर जमीनीत पार्किंग हब येणार आहे. परराज्यातील वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या बाजूला उभी केली जातात. त्यामुळे अपघातही त्या भागात वारंवार घडत असल्याचे निदर्शनात आले आहे. या ठिकाणी पार्किंग हब झाल्यास अवज़ड स्वरूपाची वाहने पार्किंग मध्ये येणार व त्यातून पैसाही संजीवनी कारखान्याच्या तिजोरीत येणार हे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत, मंजुरीसाठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठविली आहे. पुढे काय तो निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचेही प्रशासक सतेज कामत यांनी सांगितले.

Sanjivani Sugar Factory
Goa Monsoon 2023 : पावसाचे अर्धशतक; ‘पॉवर प्ले’ सुरूच, 10 जुलैपर्यंत यलो अलर्ट

भाड्याने दिलेल्या वाहतूक कार्यालयाकडून दरमहा २६ हजार रुपये कारखान्याच्या तिजोरीत जमा होत आहेत. एकूण निवासी गाळे व वाहतूक कार्यालय,पंक्चर काढणाऱ्या दुकानांतून मिळून १ लाख ३० हजार रुपयांचा निधी मिळत आहे. हे सर्व भाडे दर सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या चौ. मीटरवर निर्धारित आहेत.

सतेज कामत,प्रशासक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com