Sanauelim News : छत्रपती शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांनी वाचावा : मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन

Sanauelim News : यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले,की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन त्यांचे गुण आत्मसात करावेत. आजच्या जगात छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपले व इतरांचेही जीवन यशस्वी बनविण्यासाठी आम्हाला लाभदायक ठरू शकते.
Sanauelim
SanauelimDainik Gomantak

Sanauelim News :

साखळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श बाळगून त्यांचा इतिहास आजच्या पिढीने वाचावा व समजून घ्यावा. त्यांचे विचार व संकल्पना मनात ठेऊन पुढे जाण्याची आज गरज आहे.

सर्वांना सोबत घेऊन स्वराज्यनिर्मितीचा संकल्प केलेल्या छत्रपती शिवरायांनी गोव्यात पोर्तुगीजांकडून होणारा हिंदू धर्मियांच्या मंदिरांचा विद्ध्वंस थांबवला होता. त्यांच्यामुळेच गोव्यातील देवदेवतांची मंदिरे सुरक्षित राहू शकली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.

साखळीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, सिध्दी प्रभू, हरवळेचे पंचसदस्य संजय नाईक, दत्ताराम चिमुलकर, यशवंत देसाई, सिध्देश साळुंखे, तानाजी देसाई व इतरांची उपस्थिती होती.

Sanauelim
Goa Loksabha Election Result: अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये नाईकांच्या साथीला; डिचोलीत भाजपची ‘किमया’

यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले,की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन त्यांचे गुण आत्मसात करावेत. आजच्या जगात छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपले व इतरांचेही जीवन यशस्वी बनविण्यासाठी आम्हाला लाभदायक ठरू शकते.

समीर प्रभू यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कुलच्या तसेच साखळी सरकारी उच्च माध्यमिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचीही उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला.

Sanauelim
Goa Loksabha Election Result: दक्षिण गोव्यात अल्पसंख्याकांची एकजूट ठरली महत्त्वाची; सासष्टीचा गड सर

देशात सुराज्य पर्वाला प्रारंभ

देशात सुराज्य आणण्याच्या पर्वाला प्रारंभ झाला असून देशवासीयांनी मतदानातून या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी देशवासीयांचे व गोमंतकीयांचे अभिनंदन करीत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले. पोर्तुगीज राजवटीत पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणात हिंदू देवतांच्या मंदिरांचा विद्ध्वंस केला.

नार्वेतील सप्तकोटीश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांबरोबर गोव्यातील मंदिरे न तोडण्याबाबतचा करार केला. त्यानंतर मंदिरांची तोडफोड झाली नाही. गोव्यात हिंदू धर्म शाबूत ठेवण्यासाठी महाराजांनी मोठे योगदान दिले आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com