Sanauelim Road : साखळीतील रस्ता गेला वाहून; अवकाळीचा फटका

Sanauelim Road आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर दोन वाहने सुटण्यास कसरत करावी लागत होती. आता हा रस्ता एका बाजूने वाहून गेल्याने अधिकच धोकादायक बनला आहे.
Sanauelim Road
Sanauelim RoadDainik Gomantak

Sanauelim Road

साखळीतील देसाईनगर येथे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला भूमिगत वीज वाहिन्या घालण्यासाठी वीज खात्यातर्फे चर खणले होते, ते चर व्यवस्थित न बुझविल्याने पहिल्याच अवकाळी पावसामुळे बाजूचा रस्ताच वाहून गेला असून चर उघडे पडले आहेत. मोठ्या पावसामुळे चरांमधील माती वाहून गेली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर दोन वाहने सुटण्यास कसरत करावी लागत होती. आता हा रस्ता एका बाजूने वाहून गेल्याने अधिकच धोकादायक बनला आहे. साखळीतील भूमिगत वीज वाहिन्‍यांच्या कामांमुळे सामान्य लोकांनाच नव्हे, तर नगरपालिकेलाही हैराण करून सोडले होते.

हे काम करताना कोणतेही तांत्रिक अधिकारी किंवा पर्यवेक्षक सोबत न घेताच केवळ सामान्य कामगारच काम करत होते. त्यामुळे साखळी शहरात काम सुरू असलेल्या बहुतेक भागांमधील जलवाहिन्या या कामामुळे फुटून लोकांना पाण्याच्या समस्येला अनेकवेळा सामोरे जावे लागले होते. आत्ता पहिल्याच अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

सदर काम पूर्ण केल्यानंतर चर योग्यप्रकारे बुजविण्यात आले नव्हते. तसेच चर खोदलेला भाग रस्त्याच्या समांतर आणण्यात न आल्याने लोकांना वाहने हाकताना किंवा समोरून दुसरे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूला गाडी नेता येत नव्हती.

Sanauelim Road
Goa's Three Controversy: शांतादुर्गा, कोकण रेल्वे, फार्मा नोकरभरती; आठवडा गाजवणाऱ्या गोव्यातील तीन घटना

या चरांमधील माती पावसाच्या पाण्यामुळे वाहून जाऊन रस्ता धोकादायक बनण्याची शक्यता लोकांकडून व्यक्त करण्यात येत होती, त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, याला कंत्राटदार जबाबदार आहे, असे मत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.

नगरपालिकेकडून पाहणी

या प्रकारामुळे देसाईनगर भागातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, पालिकेचे कनिष्ठ अभियंता पोकळे यांनी या रस्त्याची पाहणी केली.

यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई तसेच मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी भूमिगत केबलिंगचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाला जाब विचारत तत्काळ चर बुजविण्याची सूचना केली. त्यासाठी नगरपालिकेच्या कामगारांनाही कामाला लावले.

कंत्राटदाराचे ‘पितळ उघड’

गेल्या दोन दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा मोठा लोंढा रस्त्यावरून वाहू लागला आणि क्षणातच रस्त्याच्या बाजूला अर्धवट बुजविलेल्या चरात शिरला आणि तेथील माती, दगड वाहून गेले.

देसाईनगर येथे जाणाऱ्या गाडीचा अंदाज चुकून गाडी जराही रस्त्याच्या बाहेर गेल्यास ती थेट ओहोळात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारांचे पितळ पहिल्याच पावसात उघड झाले.

Sanauelim Road
Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

काम कोणाचे?

चर मारून केबल घातल्यानंतर ते चर दगड व माती घालून योग्य पध्दतीने बुजवावे व रस्त्याला समांतर आणण्याचे काम हे भूमिगत केबल घालणाऱ्या कंत्राटदाराचेच आहे, असा तगादा सार्वजनिक बांधकाम खात्याने लावला होता. या खात्यांच्या खेळामध्ये देसाईनगर येथे जाणाऱ्या रस्त्याची मात्र वाताहत होऊन तो लोकांसाठी धोकादायक बनला.

रस्त्यासाठी पाठपुरावा :

रस्ते वीज भूमिगत केबल घालण्याच्या कारणामुळे खोदून ठेवले आहेत. त्यांची परिस्थिती तशीच धोकादायक आहे. हे काम सुरू झाल्यापासून आपण रस्ते पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी कोणाची? हे काम कोण करणार? यासाठी वीज खाते व बांधकाम खात्याकडे पाठपुरावा करीतच आहे. या खात्यांची संयुक्त बैठकही घेतली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम लांबले, असे नगराध्यक्ष देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com