Goa Tourism Minister Rohan Khaunte
Goa Tourism Minister Rohan KhaunteDainik Gomantak

Tourist Palces In Goa: गोव्यातील कोणती पर्यटनस्थळे सुरक्षित? पर्यटन खाते देणार माहिती

Goa Tourism Minister Rohan Khaunte: गोव्यात गेल्या काही वर्षांत खाण खड्डे, चिरेखाणी, कालवे आणि धबधबा परिसरात बुडून जवळपास 35 जणांचा मृत्यू झाला.

Goa Tourism Minister Rohan Khaunte: गोव्यात गेल्या काही वर्षांत खाण खड्डे, चिरेखाणी, कालवे आणि धबधबा परिसरात बुडून जवळपास 35 जणांचा मृत्यू झाला. राज्यात बुडून मृत्यू होण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता पर्यटन विभाग जनजागृती मोहिम राबवणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

धोकादायक पर्यटनस्थळांना भेट देताना पर्यटक काळजी घेतील, यासाठी जनजागृती मोहिम आवश्यक असल्याचे खंवटे म्हणाले.

पर्यटन खात्याच्या संचालकांशी याबाबत बोलणं झालं असून, लवकरच यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात येईल, असे खंवटे यांनी सांगितले.

राज्यातील पर्यटन स्थळे सुरक्षित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. याशिवाय, विविध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये जागृती करणे आवश्यक असल्याचेही खंवटे म्हणाले.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील नव-नवीन पर्यटन स्थळे प्रकाशझोतात आली आहेत. पर्यटक सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्या पर्यटन स्थळाविषयी पहिल्यांदाच माहिती घेत असतात. त्यानंतर ते अशा ठिकाणांना भेट देतात. पण, पर्यटन विभागाने ती ठिकाणे सुरक्षित आहेत की नाहीत याची खात्री केली पाहिजे, असे खंवटे म्हणाले.

Goa Tourism Minister Rohan Khaunte
Rohan Khaunte: बीच, कॅसिनो, धागडधिंगा म्हणजे गोवा नव्हे! पर्यटन मंत्री म्हणतात खरा गोवा...

खाण आणि भूगर्भ संचालनालयाने भाडेतत्त्वावरील खाणींना बॅरिकेड्स लावण्याचे निर्देश संबधित मालकांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारने देखील खाणींवर बॅरिकेड्स लावण्याचा निर्णयही घेतला आहे.

बुडून मृत्यू होण्याच्या घटना सामन्यत: मॉन्सून काळातच घडतात. जेव्हा खाणीमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी असते.

धोकादायक खाणींमध्ये पर्यटक किंवा स्थानिक पोहोण्यासाठी जातात तेव्हा त्यांना त्या किती खोल आहेत याचा अंदाज येत नाही. यामुळे बुडण्याच्या घटना घडतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com