Sadolxem: सादोळशे परिसरात अनोळखी युवकांचा वावर! ग्रामस्थांत चिंता; पोलिस व मामलेदारांकडे कारवाई करण्याची मागणी

Sadolashe Village: निवेदनात म्हटले आहे, की एक अनोळखी युवकांचा गट मध्यरात्रीवेळी घराचे कंपाऊंड, घराच्या फाटकाजवळ घुटमळत असतो, एका महिलेच्या तर घराच्या व्हरांड्यात येऊन तेथे थांबून पसार होतात.
Police Crime
Fake Police RobberyDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: ‌सादोळशे ग्रामस्थ रात्रीच्यावेळी होणाऱ्या असामाजिक घटकांच्या हालचालींबद्दल चिंतातुर झाले असून काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालयात नसल्यामुळे काणकोण मामलेदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

निवेदन देण्यासाठी लोरी फर्नांडिस, एर्विलो बार्रेटो, अवेलीनो बार्रेटो, ग्रैटा सिक्वेरा, इनेज जे. एस. बार्रेटो, फ्रिडा बार्रेटो, कल्पना ऊर्फ प्रणिता पी. भट, फियोना फर्नांडिस, रोजी डायस, प्लाऊजा कार्दोज, मारिया डिसिल्वा, लोवीना बार्रेटो, बार्नेट फर्नांडिस, लावेल कोर्नाले, केन्सी डिकोस्टा, गौरेश धुरी, क्लाऊडीया कुतिन्हो, सेबी केजीटन रिबेलो, सुनिता डिसा उपस्थित होत्या.

निवेदनात म्हटले आहे, की एक अनोळखी युवकांचा गट मध्यरात्रीवेळी घराचे कंपाऊंड, घराच्या फाटकाजवळ घुटमळत असतो, एका महिलेच्या तर घराच्या व्हरांड्यात येऊन तेथे थांबून पसार होतात. ग्रामस्थांमध्ये विशेष करून ४५ ते ६५ वर्षे वयाच्या वृद्ध यांमध्ये असुरक्षितता निर्माण केली जात आहे. या भागातील बहुतेक पुरुष कामांकरता विदेशात, तर काही शिक्षणानिमित्त अन्यत्र असतात. त्यामुळे या भागात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी तसेच या युवकांना हुडकून काढून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Police Crime
Goa Crime: दिवसा गुन्हे करायचे, रात्री गोवा सोडून परत जायचे! इराणी टोळीचा 3 तासांत पर्दाफाश; महाराष्ट्रातील दोघांना अटक

पोलिस तैनात करण्याची विनंती

तसेच सादोळशे येथील अरुंद पुलावर मोठ्या संख्येने येणारे पर्यटक आपली वाहने थांबवून अडथळा निर्माण करतात. रिल्स, फोटोशूट, ग्रुप फोटोसेशन यामुळे स्थानिकांना ये-जा करण्यात अडचणी येतात, विचारणा केल्यावर अपशब्द वापरून भांडायला येतात, दादागिरी करतात. त्यामुळे या पुलावर पोलिस तैनात करण्यात यावा.

Police Crime
Baga Crime: सेंट क्रॉस कपेलाच्या मूर्तींची केली मोडतोड, नदीत दिल्या फेकून; मुंबईच्या एकाला अटक

या भागातील भाडेकरू लोकांची पडताळणी करावी, गुन्हेगारी लोकांवर कारवाई करावी व लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com