गुंतवणूक सुलभ वातावरण निर्मिती हे उद्दिष्ट; मंत्री माविन गुदिन्हो

मंत्री माविन गुदिन्हो: गोवा-आयडीसीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत चर्चासत्र
Mavin Gudinho
Mavin Gudinho Dainik Gomantak
Published on
Updated on

व्यवसाय सुलभता निर्देशांक सुधारण्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही.व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने, गोवा-आयडीसीने आपल्या कामकाजावर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यांत सुधारणा आणण्याचे काम हाती घेतले आहे.

Mavin Gudinho
Margao Municipality: मडगाव पालिकेला कोट्यवधींचा नाहक भुर्दंड

गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे, नवनिर्मितीला चालना देणारे अनुकूल वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,असे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

राज्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सध्याच्या नियामक प्रणाली व कायद्यांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. गोवा औद्योगिक विकास महामंडळाने या प्रस्तावित सुधारणांबाबत औद्योगिक घटकांत सहमतीच्या उद्देशाने संवाद कार्यशाळेचे आयोजन केले होते.

Mavin Gudinho
Illegal Transport: बेकायदेशीरपणे स्फोटकांची वाहतूक

याचे उद्‍घाटन केल्यानंतर गुदिन्हो बोलत होते. यात जीएसआयए, जीसीसीआय, सीआयआय, फिक्की, लघुउद्योग भारती, असोचेमचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

प्रक्रियांचे प्रमाणीकरण करणे; आणि सर्व अधिनियम आणि नियमांमध्ये स्पष्टता आणि सुसंगतता सुनिश्चित करणे हा या सुधारणांमागचा उद्देश आहे. या सुधारणांमुळे राज्यातील गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

-प्रविमल अभिषेक, एम. डी. आयडीसी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com