Russian Beach Goa: निळ्याशार समुद्राच्या लहरी आणि विदेशी वायब; गोव्यातील 'रशियन बीच' नक्की एक्सप्लोअर करा

Russian Beach: गोव्यातील हरमल बीच, ज्याला 'रशियन बीच' म्हणूनही ओळखले जातं. उत्तर गोव्यातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे.
Russian Beach Goa
Russian Beach GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील हरमल बीच, ज्याला 'रशियन बीच' म्हणूनही ओळखले जातं. उत्तर गोव्यातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. पणजीपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असलेला हा बीच पर्यटकांमध्ये विशेषतः रशियन पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

हरमल हे एक छोटेसं मासेमारी गाव आहे, ज्यानं आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि शांत वातावरणामुळं पर्यटकांचं लक्ष वेधलं आहे. १९९० च्या दशकात हा बीच हिप्पी संस्कृतीसाठी प्रसिद्ध होता आणि आजही त्याची छाया येथं पाहायला मिळते.

संध्याकाळी या बीचवर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या संगीत आणि नृत्य कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, ज्यामुळे पर्यटकांना सांस्कृतिक अनुभव मिळतो. पॅराग्लायडिंग, कयाकिंग, आणि सर्फिंग यांसारखे साहसी खेळ इथे करता येतात.

Russian Beach Goa
Goa RERA: गोवा 'रेरा'चा दणका! रजिस्ट्रेशन न केल्यामुळे पणजीतील बिल्डरला 5 लाखांचा दंड

येथे साहसी क्रिडाप्रेमींसाठी पॅराग्लायडिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, योगा आणि ध्यानासाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हरमल आणि जवळच्या मांड्रेम बीच परिसरात अनेक योगा क्लासेस सेंटर आहेत.

हरमल बीचवर फिरायला जाण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा सर्वोत्तम कालावधी आहे, कारण यावेळी हवामान आल्हाददायक असते. पावसाळ्यात (जून-सप्टेंबर) येथे जाणे टाळावे, कारण रस्ता खराब होतो आणि समुद्रही खूप खवळलेला असतो.

Russian Beach Goa
Goa News: पणजीत मद्यधुंद पर्यटकाने महिलांवर फेकले पैसे; कॅसिनोतून बाहेर येऊन केले लाजीरवाणे कृत्य

हरमल बीचला जाण्यासाठी बस, टॅक्सी किंवा दुचाकी भाड्याने घेऊन सहज पोहोचता येते. गोवा विमानतळापासून (Dabolim Airport) सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे.

गोव्यातील गर्दीपासून दूर असलेला हा बीच वेगळ्या अनुभवासाठी योग्य आहे. प्रसिद्ध बीचेसप्रमाणे इथे पार्ट्या किंवा मोठे रिसॉर्ट्स नाहीत, त्यामुळे इथे तुम्हाला निवांत वेळ घालवता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com