Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Sunburn Festival Controversy: ‘सनबर्न’ने दाखल केलेली याचिका मी करायला लावली, असा निराधार आरोप खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी करू नये. त्यांना असे विधान करायला कुणी लावले आणि त्यांनी ते तपासून का पाहिले नाही, हे त्यांनाच माहीत; पर्यटनमंत्री खंवटे
Rohan Khaunte
Rohan Khaunte Canva
Published on
Updated on

Rohan Khaunte Urges Viriato Fernandes to Stop Making Unfounded Claims About Sunburn Case

पणजी: ‘सनबर्न’ने दाखल केलेली याचिका मी करायला लावली, असा निराधार आरोप खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी करू नये. त्यांना असे विधान करायला कुणी लावले आणि त्यांनी ते तपासून का पाहिले नाही, हे त्यांनाच माहीत. आम्ही सातवीत असताना लपाछपी खेळ खेळत होतो आणि आज कॅप्टन असेच खेळ खेळत आहेत.

कॅप्टनने कॅप्टनसारखे वागावे आणि बिनबुडाची विधाने करू नयेत, असा सल्ला पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी फर्नांडिस यांना दिला.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या सांगण्यावरून केल्या असल्याचा आरोप खासदार कॅप्टन विरियातो यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री खंवटे बोलत होते.

Rohan Khaunte
Sunburn Festival: सनबर्नसारखे फेस्टिव्हल ड्रग्जला प्रोत्साहन देतात; आमदार व्हेंझी व्हिएगस कडाडले

आमचा आवाज बंद करण्यासाठीच!

खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे पर्यटनमंत्र्यांनी आमच्यावर मानहानीचा दावा करण्यास सनबर्न आयोजकांना सांगितले आहे. हा प्रकार आमचा आवाज बंद करण्यासाठीच आहे. मात्र, आम्ही शांत बसणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com