खनिजपट्ट्यात दररोज मिळायचे किमान 40 श्‍‍वसनरोगांचे रुग्‍ण

डॉक्टरांची माहिती; मात्र वाहतूक बंद असल्याने प्रमाण 80 टक्क्यांनी घटले
Goa mining
Goa miningDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव : ज्यावेळी गोव्यात मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक केली जायची, त्यावेळी खाणपट्ट्यात श्‍‍वसनाचे आजार ही नित्याची बाब बनली होती. तेथे थंडी, खोकला आणि दम्याने त्रस्त असलेले किमान 40 रुग्ण तरी दररोज डॉक्टरांकडे तपासणीसाठी येत होते. दक्षिण गोव्यातील सांगे-सावर्डे या पट्ट्यात तर उत्तर गोव्यातील साखळी, डिचोलीतील खाण परिसरात हे रुग्ण अधिक होते. मात्र खनिज वाहतुकीचे प्रमाण मध्यंतरी घटल्याने श्वसन रुग्णांचे प्रमाण झपाट्याने खाली उतरले.हे प्रमाण किमान 80 टक्क्यांनी कमी झाले असल्‍याची माहिती प्राप्त झाली आहे.

Goa mining
वाठादेव येथे दारुच्या व्यसनातूनच पत्नीचा खून

राज्‍यात खाणी पुन्हा सुरू झाल्यास ही समस्या पुन्हा जोर धरू शकते असे मत डॉक्टरांनी मांडले. यासंबंधी आरोग्य खात्याने कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही हीसुद्धा बाब पुढे आली. आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर यांना विचारले असता आमच्याकडे कसलाही अभ्यास नाही असे त्यांनी सांगितले.

बऱ्याच वर्षांपूर्वी कुडचडे येथील खासगी डॉक्टरांनी एकत्र केलेल्या माहितीत या भागात बरेच श्‍‍वसनाचे आजार असलेले रुग्ण असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. याच महितीच्या आधारे स्थानिक नागरिक समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने खनिज वाहतूक ताडपत्रीने झाकून करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर असा अभ्यास गांभीर्याने झालाच नाही ही गोष्ट डॉक्टरांनी मान्य केली.

दरम्यान सध्या ज्या मार्गावरून खनिज ट्रक वाहतूक करतात, त्या मार्गावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण तपासणी यंत्रणा बसविली आहे. या भागात किती प्रमाणात प्रदूषण होते, त्याचे मोजमाप मंडळ करते. हे प्रदूषण जास्त प्रमाणात आढळल्यास आम्ही प्रतिबंधात्‍मक उपाय हाती घेतो, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

कुडचडे भागात खनिज वाहतूक तेजीत सुरु होती, त्यावेळी श्वसन रुग्णांचे प्रमाण बरेच जास्त होते. कधी कधी आमच्याकडे असे विकार असलेले 5 ते 7 रुग्ण यायचे. मात्र कोविडनंतर ही वाहतूक कमी झाली. त्याचा चांगला परिणाम म्हणजे या रुग्‍णांचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी झाले, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com