Mahadayi Water Dispute : हणजूण-कायसूव ‘जैवविविधता’कडून ‘म्हादई’संबंधित ठराव!

नदीवरच गोमंतकीयांचे जीवन व जैवविविधता अवलंबून
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute : म्हादई नदी ही गोव्याची जीवनदायिनी असून कर्नाटकने या नदीवर बांध घालून पाणी वळवण्याचा प्रयत्न केल्यास गोव्यातील जैवविविधता नष्ट होईल. कारण या नदीवरच गोमंतकीयांचे जीवन व जैवविविधता अवलंबून आहे.

या पार्श्वभूमीवर, हणजूण-कायसूव जैवविविधता व्यवस्थापन समितीने गोवा जैवविविधता मंडळाच्या आवाहनानुसार म्हादई नदी वाचवण्याकरिता ठराव घेतला आणि तो मंडळाकडे पाठवून दिल्याची माहिती या हणजूण-कायसूव जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी दिली.

Mahadayi Water Dispute
Goa Crime News: तोरसेत स्कॉर्पियोतून 3 लाखाचा मद्यसाठा जप्त

शुक्रवारी हणजूण पंचायतीजवळ घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासोबत समितीचे सदस्य सत्यवान हरमलकर, संजय नार्वेकर व ऍस्ट्रॉलिटा फर्नांडिस उपस्थित होते. गोव्यातील बहुतेक ग्रामसभांनी म्हादईसाठी ठराव घेतला आहे.

हणजूण-कायसूव पंचायतीने अद्याप ग्रामसभा आयोजित केलेली नसल्याने म्हादई नदीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, अशी लेखी मागणी आपण पंचायतीकडे केली असल्याचे अध्यक्ष रमेश नाईक म्हणाले.

Mahadayi Water Dispute
kaneri math kolhapur : देशात एक देवस्थान, एक गोशाळा हवी : ब्रह्मेशानंदाचार्य

"म्हादई नदीच्या इतर उपनद्या गोव्यातून वाहताहेत. या नद्यांचे पाणी सर्व गोव्याची तहान भागवत आहे. पाण्याचा प्रश्न किती जटील आहे, हे म्हादईच्या विषयावरून गोव्याला कळाले आहे."

"लोकांनी या समस्येचा ध्यास घेतला नाही तर भविष्यात त्यांच्या गळ्याला फास लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी वाचविण्यासोबत जैवविविधता वाचवणे, जलसंवर्धन करणे, नद्यांचे रक्षण करणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे."

- रमेश नाईक, अध्यक्ष, हणजूण-कायसूव जैवविविधता व्यवस्थापन समिती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com