kaneri math kolhapur : देशात एक देवस्थान, एक गोशाळा हवी : ब्रह्मेशानंदाचार्य

सिद्धगिरी मठात सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव
kaneri math kolhapur
kaneri math kolhapurDainik Gomantak

kaneri math kolhapur : आपल्या ॠषिमुनींनी उत्सवांच्या माध्यमातून विचारपूर्वक आचार, विचार समाजासमोर ठेवले. धर्म, संस्कृती, पंचमहाभूते ह्यांचा आचारविचार आमच्या जीवनात बसवले गेले होते. देशात एक देवस्थान, एक गोशाळा हवीच आणि याच उद्देशाने गावागावांमध्ये गोशाळा व्हावी.

त्याचप्रमाणे कृषी व्यवसाय वाढावा, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून देश-विदेशात पोचावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी केले.

kaneri math kolhapur
Dona Paula Jetty: दोना पावला जेटीवर आता पर्यटकांसाठी 'इतके' शुल्क; कोस्टल सर्किट प्रोजेक्टचे अनावरण

सिद्धगिरी मठ, कणेरी,कोल्हापूर येथे सुरु असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमानिमित्त चतुर्थदिनी संत उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, हिंदु धर्माच आदर्श विचार पद्धती आहे, ती गुरुकुलच्या माध्यमातून आपल्या लहान मुलांकडे पोहोचविण्याची गरज आहे. आपली संस्कृती, धर्म या माध्यमातून उत्तम शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. आचार्य सभेचे संयोजक परमात्मानंद सरस्वती व इतर संत महंत उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com