Curti Khandepar News: ..हा रस्ता म्हणजे अपघाताला निमंत्रण! कुर्टीतील नागरिकांची गैरसोय; वाहने चालविणे मुश्कील

Curti Khandepar Bad Road: कुर्टी - बाजारमळ येथील या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून वाहनचालक या रस्त्याने येणे टाळत असल्याने रहिवाशांना अतिशय अडचणींचा सामना करावा लागतो.
Curti Khandepar Sumit Mountain
Curti Khandepar Sumit Mountain Dainik Gomantak
Published on
Updated on

Curti Khandepar Bad Roads Causes Accidents

फोंडा: कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रातील बाजारमळ येथील ‘सुमित माऊंटन रहिवासी संकुला’कडे जाणारा रस्ता खराब झाल्याने या रस्त्यावरून येणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे असून सरकारने हा रस्ता दुरुस्त करावा आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

बाजारमळ येथील रस्त्यांशेजारी बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत आणि गाडे थाटण्यात आल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना असा प्रकार झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. स्थानिक पंचायतीकडून अशा प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

कुर्टी - बाजारमळ येथील या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून वाहनचालक या रस्त्याने येणे टाळत असल्याने रहिवाशांना अतिशय अडचणींचा सामना करावा लागतो. उतरणीच्या असलेल्या या रस्त्यावरील खडी बाहेर आल्याने तसेच खड्डे पडल्याने वाहन चालवणे मुश्‍किलीचे ठरले असून ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी वर्गाची अतिशय गैरसोय होत असल्याची कैफियत येथील नागरिकांनी मांडली. या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून लोकांना दिलासा द्यावी, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. यावेळी ब्रम्हानंद नाईक, प्रज्योत महाले, मुग्धा मणेरीकर, सरिता दळवी, सुनीता बोरकर व इतरांनी आपली कैफियत मांडली.

पंचाकडे कैफियत मांडली; पण..!

बाजारमळ येथील ‘सुमित माऊंटन रहिवासी संकुला’तील नागरिकांनी या खराब रस्त्याप्रकरणी कुर्टी - खांडेपार ग्रामपंचायत तसेच स्थानिक प्रभाग पंच सदस्याकडे आपली कैफियत मांडली, पण अजून काहीच झाले नाही. फक्त एकदाच सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली, तीही पहिल्याच पावसात वाहून गेल्यामुळे आता रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

गोवा

Curti Khandepar Sumit Mountain
Colvale Jail: कोलवाळमधील 'तो' कैदी धोक्याबाहेर! न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी; गायब 'नोंदवही'चीही घेणार दखल

रुग्णाला नेणे ठरतेय अवघड?

या रहिवासी संकुलात एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला इस्पितळात घेऊन कसे जावे असा सवाल येथील ज्येष्ठ नागरिकांनी केला. रस्ता अतिशय खराब असल्याने रुग्णवाहिका इमारत संकुलापर्यंत नेण्यास वाहनचालक नाराजी व्यक्त करतात. भाड्याची मोटारसायकल तसेच रिक्षावालेही संकुलाकडे येण्यास स्पष्ट नकार देत असल्याने आजारी माणसाचे करायचे काय, असा सवाल या ग्रामस्थांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com