Khandepar Bandhara: बंधारा प्रश्नी खांडेपारवासीय आता एनजीटीकडे दाद मागणार

सरकारच्या दुर्लक्षामुळे संताप
bandhara
bandhara
Published on
Updated on

मुर्डी खांडेपार व सोनारबाग येथील लोकांचा विरोध असूनही सरकार लोकांना दाद देत नसल्याने अखेर बंधाऱ्यासंबधी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्याची तयारी मुर्डी व सोनारबाग येथील लोकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुर्डी -खांडेपार येथे १४४ कलम लागू करून उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे पाणी एका उद्योगपतीच्या स्टील प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात सरकार धडपडत आहे.

केरी परसरातील भूतखांबवर स्टील प्रकल्प उभारल्यास केरी, वळवई, वेरे- वाघूर्मे, खांडेपार व उसगाव पंचायत क्षेत्रातील जलस्रोत पूर्णपणे नष्ट होणार आहेत.

निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी मुर्डी व सोनारबाग गावातील प्रकल्पाला करीत असलेला विरोध भावी पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

दूधसागर नदीवर बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने सरकारने संचारबंदी लागू करून जबरदस्तीने काम सुरू केले आहे.

१४४ कलम लागू करण्याची प्रक्रिया फक्त एका दिवसात केल्याचेही ग्रामस्थ म्हणाले. सरकार संचारबंदी लागू करून प्रकल्पाचे काम सुरु करू शकत नाही,असेही सांगण्यात आले.

bandhara
ST Reservation in Goa: भाजप सरकारचे केंद्रीय मंत्री म्हणतात गोव्यात ST आरक्षण अशक्य

प्रियोळ पंचायत मंडळही अंधारात

सरकार जबरदस्तीने बंधारा उभारण्यास महत्व देत असले तरी मुर्डी व सोनारबागवासीय प्रकल्पाला गेल्या दोन वर्षांपासून विरोध करीत आहेत. प्रकल्पासंबंधी प्रियोळ मतदारसंघातील लोकांना व पंचायत मंडळाला अंधारात ठेवले आहे.

त्यामुळे लोकांत जागृती करून बंधाऱ्याचे पाणी स्टील प्रकल्पासाठी असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्नही आम्ही सुरू केला आहे. तसेच लढा यशस्वी करण्यासाठी लोकांनी संघटित राहण्याची अधिक गरज असल्याचेही एका नेत्याने सांगितले.

सावईवेरेतही गुप्त बैठक

सावईवेरे येथील नीलेश हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणीही गुप्त बैठक झाली या बैठकीत त्या भागातील पुष्कळ ग्रामस्थ उपस्थित होते.

या ग्रामस्थांना बंधारा या ठिकाणी आल्यास काय होणार आणि त्या बंधाऱ्याचे पाणी या भागात कशासाठी आणणार या विषयी सविस्तर सांगितले असून त्या लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे.आम्ही सर्व या पुढे एकत्र लढा देण्याच्या विचारात असल्याचेही ‘त्या’ नेत्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com