
वास्को: गोवा शिपयार्ड कंपनी तर्फे व्यवसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून मुरगाव नगरपालिकेला जनतेच्या सेवेसाठी मोबाईल शौचालय भेटविण्यात आला होता. पण सद्या हा मोबाईल शौचालय वास्कोत येणाऱ्यांच्या स्वागतासाठी चक्क मुरगाव नगरपालिका व वास्को प्रथमश्रेणी न्यायालयाच्या मधोमद ठेऊन, संबंधीताने स्वच्छता अभियानाची फजीती करून ठेवल्याची टीका जेष्ठ नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
(Remove mobile toilet in front of Mormugao Municipality and Vasco Court)
वास्कोची शोभा वाढविण्यासाठी मोबाईल शौचालय नगरपालिकेसमोर
'स्वच्छ भारत - नितळ गोय ' अभियाना अंतर्गत गोवा शिपयार्ड कंपनीने वास्कोत येणाऱ्या नागरीकांबरोबर इतरांना नैसर्गिक विधी सेवा मिळावी यासाठी मोबाईल शौचालय व्यवसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत मुरगाव नगरपालिकेला देण्यात आला होता.
सद्या या मोबाईल शौचालयाची परिस्थीती नागरीकांना नैसर्गिक विधी करण्यासाठी योग्य नसल्याने, हे मोबाईल शौचालय वास्कोची शोभा वाढविण्यासाठी चक्क मुरगाव नगरपालिका व वास्को प्रथमश्रेणी न्यायालयाच्या मधोमद ठेवण्यात आला आहे.
पणजी - मडगाव व इतर ठिकाणाहून कामानिमित्त वास्कोत येणार्यां जाणार्यांना आकर्षित करण्यासाठी मोडकळीस आलेला मोबाईल शौचालय सद्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. राज्यात 'अ ' दर्जाची मुरगाव नगरपालिका असून सुद्धा भंगारात टाकणारा मोबाईल शौचालय वास्कोतील एफ एल गोम्स रस्त्याच्या बाजूस ठेवून एका प्रकारे पालिकेने स्वता बरोबर वास्को वासियांचा अपमान केला असल्याची टीका जेष्ठ नागरीकांतर्फे करण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.