Goa News: फोंड्यात गांधी, आंबेडकरांच्या पुतळ्यांचे अनावरण

फोंड्यातील उद्यानात महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्यात आल्याचे राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
Goa News |Dr. Babasaheb Ambedkar| Mahatma Gandhi
Goa News |Dr. Babasaheb Ambedkar| Mahatma GandhiDainik Gomantak

Goa News: देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने मानाने जगण्याचा हक्क दिला. आपल्या देशाला हे संविधान प्रदान केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पकतेमुळेच आज प्रत्येक भारतीयाला अधिकार मिळाला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व इतरांनी देशाला ब्रिटिश सत्तेतून मुक्त करण्यासाठी लढा दिला, म्हणूनच या थोर नेत्यांचे स्मरण सातत्याने व्हावे यासाठी फोंड्यातील उद्यानात महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्यात आल्याचे फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

फोंड्यातील क्रांती मैदानावर गुरुवारी प्रजासत्ताकदिनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर रवी नाईक यांनी ध्वजारोहण केले.

त्यानंतर पोलिसांची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना नाईक डांगी व इतर नगरसेवक, सरकारी अधिकारी, लष्कराचे अधिकारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Goa News |Dr. Babasaheb Ambedkar| Mahatma Gandhi
Goa News: डिचोली केंद्रशाळेचे आज उद्‍घाटन

नागरिकांच्या मागणीचा सन्मान

फोंड्यात महात्मा गांधी व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा पुतळा कुठेच नव्हता. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे पुतळे बसवण्याची मागणी फोंडा पालिकेकडे करण्यात आली होती,

त्यामुळे नगराध्यक्ष रितेश नाईक यानी याकामी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पालिका उद्यानात महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळे बसवले. या पुतळ्यांचे अनावरण फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com