RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशाला गरज : महेश ढवळीकर

समाज संघाकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यासाठी संघ म्हणजे नेमके काय याचा अनुभव घेणे व तो समजून घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
Rashtriya Swayamsevak Sangh
Rashtriya Swayamsevak Sangh Dainik Gomantak

RSS : सासष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सासष्टी शाखेने विजयादशमीनिमित्त रविवारी मडगावात पथसंचलन केले. तसेच रवींद्र भवनमध्ये ध्वजारोहण, शस्त्रपूजन, प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम झाले.

प्रमुख वक्ते संघाचे गोवा विभागाचे कार्यवाह महेश ढवळीकर यांनी यावेळी सांगितले की, ९८ वर्षांनंतर देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशाला गरज आहे. समाज संघाकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यासाठी संघ म्हणजे नेमके काय याचा अनुभव घेणे व तो समजून घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

जातीच्या आधारावर उच्च-नीच असे भेदभाव होता कामा नये. देशाला स्वावलंबीत बनवणे आमच्या हातात आहे. त्यासाठी स्वदेशीचा अवलंब करणे, नागरी शिष्टाचार पाळणे, पर्यावरण सांभाळणे, पाण्याची बचत या सारख्या गोष्टी करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.

Rashtriya Swayamsevak Sangh
Goa Crime - 100 जणांना 21 कोटीं रुपयांना लूटले | Gomantak TV

हिंदू होण्याचा अभिमान बाळगा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रमुख पाहुण्या निवृत्त लेफ्टनंट कर्नल अनुराधा मलिक यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळून देशाबद्दलच कर्तव्य व देश निष्ठा बाळगा असे त्यांनी सांगितले.

नागरिकांची वागणूक, त्यांचे चालचलन, विचार यावरुन देशाची ओळख ठरते असेही त्यांनी सांगितले. युवाशक्ती ही देशभक्ती असल्याने युवकांनी योग्य मार्ग अवलंबावा. वर्तमान सांभाळून उज्ज्वल भविष्याचा विचार करावा, असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाला समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com