Valpoi News : भिरोंडा-सत्तरीत उद्यापासून ‘रणमाले’ महोत्सव

Valpoi News : ४ पथकांचा सहभाग : वाळपई ग्रामीण कला-सांस्कृतिक संस्थेचे आयोजन
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News : वाळपई, ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था वाळपई, कला आणि संस्कृती संचालनालय पणजी आणि ग्रामपंचायत भिरोंडा-सत्तरी यांच्यातर्फे येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणावर स्व. रामा राघोबा धुरी स्मृती १३व्या रणमाले महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यानिमित्त रविवार, ११ व सोमवार, १२ रोजी विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष अंकुश धुरी यांनी वाळपई वन विश्राम गृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत दिली.

यावेळी पत्रकार परिषेदत संस्थेचे अघ्यक्ष अंकुश गावस, भिरोंडाचे सरपंच उदयसिंह राणे, प्रशांत नाईक, सुभाषचंद्र गावस आदींची उपस्थिती होती.

या सोहळ्याचे उद्‌घाटन रविवार, ११ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भिरोंडा येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, प्रमुख पाहुणे म्हणून पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे, कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, भिरोंडाचे सरपंच तथा कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष उदयसिंह राणे, खास आमंत्रित फादर आग्रेलो राॅड्रिग्स आदींची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी रात्री ८.१५ ते १०.३० वा. रणमाले सादरीकरण करण्यात येणार आहे.

सोमवार, १२ रोजी सायं. ५.३० ते ६.३० वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी लोककला अभ्यासक व राज्य संस्कृती पुरस्कार विजेते झिलू गावकर, तसेच लोककलाकार व लोककला अभ्यासक श्रीकांत गावडे व प्राजक्ता गावकर असणार आहेत.

तसेच रमणाले कलाकार पांडुरंग ठाणेकर यांची उपस्थिती असेल. त्यानंतर सायं. ७ ते रात्री ८ वा. रणमाले सादरीकरण, रात्री ८.१५ ते ९ वा. समारोप सोहळा होणार आहे. रात्री ९.१५ ते १०.३० वाजता रणमाले सादरीकरण करण्यात येईल.

Valpoi
Goa Water Issue: वेळुस वाळपई मुख्य रस्त्यावर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया

यावेळी एकूण ४ रणमाले पथकांनी सहभाग घेतला असून कुडशे-सत्तरी येथील ओम साई रणमाले पथक कुडशे, हुणेश्वर रणमाले पथक करंझोळ-सत्तरी, भूमी क्रिएशन क्लब साखळी तसेच मांगेली रणमाले पथक महाराष्ट्र आदींचा सहभाग असणार आहे.

यावेळी चारही रणमाले पथकांच्या ज्येष्ठ रणमाले कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असून गावातील ज्येष्ठ कलाकारांचाही मान्यवरांच्या हस्ते खास सन्मान करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com