Ramesh Tawadkar: 'आता गावडेंवर काय कारवाई होते पाहू'; मंत्र्यांच्या कामगिरीबाबत तवडकरांचा सरकारला घरचा आहेर

Goa Politics: आंतरिक वाद गाजत असताना काही गोष्टी आणि मंत्र्यांच्‍या कामगिरीबाबत आपण समाधानी नसल्याने विधान करून सभापती रमेश तवडकर यांनी सरकारला घरचा अहेर दिला.
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

Ramesh Tawadkar On Goa Ministers About Cash For Job and Tribal Dispute

तिसवाडी: राज्यात सध्या नोकऱ्यांचा चोरबाजार आणि आदिवासी समाजात निर्माण झालेल्या आंतरिक वाद गाजत असताना काही गोष्टी आणि मंत्र्यांच्‍या कामगिरीबाबत आपण समाधानी नसल्याने विधान करून सभापती रमेश तवडकर यांनी सरकारला घरचा अहेर दिला.

वृत्तपत्र आणि समाजमाध्यमांवर ज्या काही गोष्टी ऐकू येतात, त्‍यामुळे पाहून मला कष्ट होत असल्याने सत्ताधारी पक्षाचा मी देखील घटक असल्याने याचे वाईट वाटते, अशी व्यथा तवडकर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली.

सरकारातील मंत्र्यांना गुण देण्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, आपण त्यांना गुण देऊन मूल्यांकन करणार नाही, परंतु अर्थसंकल्पात प्रत्येक खात्यासाठी केलेल्‍या आर्थिक तरतुदीचा फायदा जनतेला व्हायला पाहिजे, असे मला वाटते.

त्या दृष्‍टिकोनातून पाहता मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक निवडणुकांतून सभापती पदावर विराजमान झालेल्या व्यक्ती पराभूत होऊन घरी गेल्याचे दिसून आले.

राजेश पाटणेकर यांनी आपण निवडणूक लढवणारच नाही असा पवित्रा घेतला होता. मंत्र्यांच्या कामगिरीचा फटका अखेर सभापतींना देखील सहन करावा लागल्याचे ते उदाहरण आहे. मी देखील त्याच दिशेने जात असल्याने आता माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समजू लागले आहे, अशी चिंता तवडकर यांनी व्यक्त केली.

पक्षांतराच्या विषयावरून सरकारच्या बाजूने निवाडा दिला असला तरी तवडकर यांनी पक्षांतराबाबत अप्रत्यक्षरीता आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, इतर पक्षांतून आलेल्या आमदारांनी आणि त्यांना स्वीकारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकारणाच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात. कारण पक्षांतर करणाऱ्यांना जनता सहसा माफ करत नाही.

Ramesh Tawadkar
Goa Crime: चोर्ला घाटात सापडला मद्यसाठा! वाळपई पोलिसांची कारवाई; 24 हजारांची दारु जप्त

...म्‍हणून मी तक्रार केली

मंत्री गोविंद गावडे यांनी एका संस्थेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कार्यक्रमासाठी दिलेल्या अनुदानावरून माझ्यावर शब्दप्रहार केले. तशी ध्वनिफीत सार्वजनिक झाली आहे. मी मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारणा केली. मी त्या संस्थेला अनुदान द्या असे सांगितले होते का, अशी ती विचारणा होती. नंतर काणकोणच्या रवींद्र भवनाच्या उद्‍घाटन सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांसमक्ष माझ्यावर भाष्य केले. ‘उटा’च्या मेळाव्यातही मुख्यमंत्र्यांच्याच समक्ष तसे केले. आता मी तक्रार केली आहे. आता कारवाई काय होते याची मला प्रतीक्षा आहे, असे रमेश तवडकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com