Corruption Case: भ्रष्टाचारात रंगेहाथ पकडूनही निर्दोष; ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ उपलब्ध नाही, साक्षीदारांच्या जबानीतही तफावत

Goa Corruption Case: भ्रष्‍टाचार विरोधी पथकाकडून जेव्‍हा कोणावरही छापा टाकला जातो, त्‍यावेळी त्‍याचा पुरावा म्‍हणून ‘व्‍हिडिओ रेकॉर्डिंग’ केले जाते.
Railway engineer Madhu Naidu was acquitted by the court under the Prevention of Corruption Act
Railway engineer Madhu Naidu was acquitted by the court under the Prevention of Corruption Act Dainik Gomantak

Goa Corruption Case: भ्रष्‍टाचार विरोधी पथकाकडून जेव्‍हा कोणावरही छापा टाकला जातो, त्‍यावेळी त्‍याचा पुरावा म्‍हणून ‘व्‍हिडिओ रेकॉर्डिंग’ केले जाते. मात्र रेल्‍वे अभियंता मधू नायडू याच्‍यावर कथित छापा टाकून त्यांना रंगेहाथ पकडले गेले खरे, मात्र ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ च उपलब्ध नसल्याने तसेच साक्षीदारांच्या जबानीतही तफावत आढळून आल्यामुळे त्याची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाच घेताना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने दक्षिण पश्चिम रेल्वेचे तंत्रज्ञ मधू नायडू याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी प्रक्रियेत त्रुटी असल्यामुळे तसेच साक्षीदारांच्या जबानीत तफावत असल्यामुळे न्यायालयाने नायडूची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश दक्षिण गोवा विशेष न्यायालयाचे (भ्रष्टाचार) न्या. ईर्शाद आगा यांनी दिला.

Railway engineer Madhu Naidu was acquitted by the court under the Prevention of Corruption Act
Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

...असा रचला होता सापळा!

ठरल्याप्रमाणे पैसे घेण्यासाठी संशयित नायडू ३ फेब्रुवारी २०१५ रोजी गोव्यात आले. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी नायडूला १० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याला अटक करून २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्याची सुटका केली. या प्रकरणी सीबीआयने दोन्ही संशयितांविरोधात २० ऑक्टोबर २०१५ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने ६ सप्टेंबर २०१७ रोजी दोन्ही संशयितांविरोधात खटला सुरू केला.

सुनावणीला हजर राहत नसल्यामुळे मधू नायडूला ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक केली. त्यानंतर त्याची ३० नोव्हेंबर २०२२ रोजी जामिनावर सुटका केली. त्यानंतर ते पुन्हा फरार झाले. न्यायालयात सुनावणीला हजर राहत नसल्याने नायडूला १७ फेब्रुवारी २०२४ रोजी पुन्हा अटक करण्यात आली होती.

Railway engineer Madhu Naidu was acquitted by the court under the Prevention of Corruption Act
Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

न्यायालयाने दुसरी संशयित सुषमा फर्नांडोला ८ जून २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२३ रोजी तिची सुटका केली. याच दरम्यान तिच्या विरोधात सुनावणी घेऊन तिला २४ जानेवारी २०२४ रोजी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. शिक्षेचा कारावास तिने यापूर्वीच भोगल्यामुळे तिची सुटका करण्‍यात आली. संशयित नायडू याला तक्रारदाराची फसवणूक केल्याप्रकरणी ६ महिन्यांची साधी कैद, तर षड्‌यंत्र रचल्यामुळे ३ महिन्यांची साधी कैद व इतर शिक्षा सुनावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com