Quepem Rain : केपे, कुडचडे परिसरात पडझड; बत्ती गुल

Quepem Rain : रात्र अंधारात कुयणामळ वीज उपकेंद्रावर संतप्त लोकांचा मोर्चा
Quepem Rain
Quepem RainDainik Gomantak
Published on
Updated on

केपे, काल वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केपे, रिवण, कुडचडे व सावर्डे भागात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने काहींची घरे, चारचाकी वाहनांची हानी झाली असून वीजपुरवठाही खंडित झाल्याने लोकांना रात्र अंधारात काढावी लागली.

परिणामी रिवण भागातील सुमारे २०० लोकांनी कुयणामळ वीज उपकेंद्रावर मोर्चा काढला. सध्या पाऊस काही प्रमाणात कमी झाला असला तरी मध्येच वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे लोकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

धडे-सावर्डे येथे एका घरावर झाडाच्या फांद्या मोडून पडल्याने घराचे पत्रे व आतील साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. तर सोनफातर तिळामळ येथे कारवर झाड पडून गाडीचे नुकसान झाले.

कट्टा-अमोणा येथे घरावर माड पडल्याने नुकसान झाले तसेच वीज तारांवर झाडे पडल्याने या भागात वीज पुरवठा खंडित झाला. केपे भागात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे केपे बाजारातील व्यावसायिक हैराण झाले. परिणामी व्यवसाय ठप्प होत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसापासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे शिरवई, जांबावली, रिवण, पिळर्ण, सुळकर्णा, काजूर तसेच इतर ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. तसेच काही लोकांना दोन दोन दिवस रात्र काळोखात काढावी लागत असल्याने काल रात्री रिवण भागातील सुमारे दोनशे लोकांनी कुयणामळ उप वीजकेंद्रावर मोर्चा काढला.

Quepem Rain
G- Marimuthu : 'जेलर' फेम साऊथच्या या ज्येष्ठ अभिनेत्याचा मृत्यू...साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का

आज आमदारांसोबतबैठक

सध्या पावसाने वाऱ्यासह हजेरी लावल्याने झाडे मोडून वीज तारांवर पडत असल्याने वीज कर्मचाऱ्यांची बरीच धावपळ होते. कुयणामळ उप वीज केंद्राखाली बऱ्याच ग्रामीण भागात वीज पुरवठा केला जात असल्याने या केंद्रावर वीज खात्याने जास्त संख्येने वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. सदर विषयावर चर्चा करण्यासाठी आज शनिवारी सकाळी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com