Quepem
QuepemDainik Gomantak

Quepem: केपे गणेशोत्‍सवाची लॉटरी ठरली 'हिट', काही तासांतच 1.5 लाख तिकिटांची विक्री

Quepem luxury car lottery: केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही महाप्रसाद पावतीसाठी आलिशान वीस चारचाकी वाहने बक्षीस रूपात ठेवली.
Published on

केपे: केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही महाप्रसाद पावतीसाठी आलिशान वीस चारचाकी वाहने बक्षीस रूपात ठेवली. काही वेळातच दीड लाख म्‍हणजे सर्वच्‍या सर्व तिकिटांची विक्री झाली. एका तिकिटाची किंमत ५०० रुपये आहे.

केपे गणेशोत्‍सव मंडळाच्‍या देणगी कुपन खरेदीसाठी दरवर्षी झुंबड उडते. आज सुमारे एक-दीड किलोमीटर रांग लागली होती. कुपन मिळविण्यासाठी काल रात्रीपासूनच काहींनी ठाण मांडले होते.

Quepem
Goa Accident: वेळगे-सत्तरीत भटक्या गुरांमुळे दुचाकीचा अपघात, एक जखमी

यंदा पहिले बक्षीस बीएमडब्ल्यू कार तर दुसरे ऑडी क्यू-३ ही आलिशान कार ठेवण्यात आले आहे. तसेच थार, विंडसर, ग्रँड विटारा, क्रेटा यांसारख्या २० गाड्याही बक्षीस रुपाने मिळणार आहेत. सर्व दीड लाख तिकिटे काही तासांतच संपली, असे मंडळाचे अध्यक्ष नीलेश फळदेसाई यांनी सांगितले.

Quepem
Goa Assembly Monsoon Session: विधानसभेत घुमला खाणपट्ट्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्‍यांचा आवाज, 'सांडूर-बेल्‍लारी'चे दाखले, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

रक्तदात्‍यांसाठी सवलत

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. काल १ ऑगस्ट रोजी २५० रक्तदात्यांनी रक्तदान केले तर उद्या ३ रोजी सुमारे २०० दाते रक्तदान करणार आहेत. रक्तदात्यांसाठी रांगेत उभे न राहता तिकीट खरेदी करता येईल, असे नीलेश फळदेसाई म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com