Goa Drug Case: पुण्याच्या तरुणाला गोव्यात अटक; 86 हजारांचे अमली पदार्थ जप्त

Goa Drug Case: गोव्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांची धडक मोहीम सुरु आहे. राज्यात मोठ्याप्रमाणात छापेमारी करुन पोलिसांनी लाखोंचा अमली पदार्थ जप्त केला आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak

Goa Drug Case: गोव्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांची ड्रग्जविरोधात धडक मोहीम सुरु आहे. राज्यात मोठ्याप्रमाणात छापेमारी करुन पोलिसांनी लाखोंचा अमली पदार्थ जप्त केला आहे. यातच आता, पेडणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी छापेमारी करुन तब्बल 86,000 हजाराचा अमली पदार्थ जप्त केला. आरोपी हा महाराष्ट्रातील आहे. आरोपीचे नाव आकाश राजेश संचेती असून तो मूळचा पुण्याचा आहे.

दरम्यान, पेडणे पोलिसांकडून एनडीपीएस कायद्याच्या कलम 20(बी)(आय)(ए) आणि 22(अ) अंतर्गत आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी) पेडणे यांच्यासमोर हजर करण्यात आले, जिथे त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Goa Drug Case
Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

गुप्तचर माहितीच्या आधारे पीएसआय तुकाराम चोडणकर, नवनीत गोलटेकर, पीसी प्रजोत मयेकर आणि शशांक शाखळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पीआय सचिन लोकरे, पेडणेचे एसडीपीओ जिवबा दळवी आणि एसपी अक्षत कौशल यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com