टॅक्सी बाजुला घ्यायला सांगितल्याने मारहाण; दिवाळीला गोव्यात गेलेल्या कुटुंबीयांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Calangute Crime: याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी पीटर फिलिप नोरोन्हा याला शुक्रवारी सकाळी अटक केली.
कार बाजुला घ्यायला सांगितल्याने मारहाण; दिवाळीला गोव्यात गेलेल्या कुटुंबीयांसोबत घडला धक्कादायक प्रकार
Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा/कळंगुट: राज्यात येणाऱ्या पर्यटकांसोबत गैरवर्तनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. स्थानिकांकडून मौजमजेसाठी आलेल्या पर्यटकांना मारहाण होण्याच्या घटना हल्ली वरचेवर घडू लागल्याने गोव्यातून एक नकारात्मक संदेश सर्वत्र जात आहे.

कारगाडी बाजूला घेण्याच्या शुल्लक कारणावरून, दोघा स्थानिक टॅक्सीचालकांनी पुणेस्थित शेख कुटुंबीयांतील महिलांसह इतर सदस्यांना मारहाण करण्याची धक्कादायक घटना कळंगुट येथे सेंट अँथनी चॅपेलजवळ दिवाळीच्या दिवशी (ता.३१) सायंकाळी घडली.

दिवाळीनिमित्त सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात आलेल्या कुटुंबाला या कटू अनुभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला असून संशयितांनी पीडित कुटुंबीयांना मारहाण केली, तेव्हा ते टॅक्सीचालक दारूच्या नशेत होते, असा दावा पीडितांनी केला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी पीटर फिलिप नोरोन्हा याला शुक्रवारी सकाळी अटक केली.

कार बाजुला घ्यायला सांगितल्याने मारहाण; दिवाळीला गोव्यात गेलेल्या कुटुंबीयांसोबत घडला धक्कादायक प्रकार
Calangute Crime: पुण्यातील कुटुंबाला गोव्यात टॅक्सी चालकांकडून मारहाण, एकाला अटक

असा घडला मारहाणीचा प्रकार

१) पीडितांनी माध्यमांसमोर सांगितले की, आम्ही कुटुंबीयांसोबत डिनरसाठी जाताना, आमच्या गाडीसमोर एक चारचाकी उभी होती. त्यावेळी संबंधित टॅक्सीचालकास त्याची गाडी थोडीशी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, तो टॅक्सीचालक एकदम हिंसक झाला व त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर, अचानक हात उचलला.

२) तसेच महिलांनादेखील मारहाण केली. यात आणखीन एका टॅक्सीचालकाने देखील पर्यटक कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. हा प्रकार कुटुंबीयांनी मोबाईलवर शुटिगं करण्यास सुरुवात केली असता संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. पीडितांनी कारगाडीचा क्रमांक नोंद करून घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com