Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

Ponda Hospital : कुणीही कितीही अपप्रचार केला तरी फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ हे फोंडा तालुका तसेच लगतच्या इतर भागातील रुग्णांना वरदान ठरल्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.
Ponda Hospital
Ponda Hospital Dainik Gomantak

Ponda Hospital :

फोंडा, फोंड्यातील बहुचर्चित आयडी अर्थातच उपजिल्हा इस्पितळात आरोग्याच्या उपयुक्त सुविधा येत्या ऑगस्टपर्यंत न पुरवल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा गोवा फॉरवॉर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी येथे बोलताना दिला.

फोंड्यात आयडी इस्पितळ मोडून भव्य इस्पितळ प्रकल्प उभारला, पण या इस्पितळ प्रकल्पात सीटीस्कॅन, रक्तपेढी, पुरेसा डॉक्टरवर्ग तसेच इतर आवश्‍यक सुविधा नसल्याने रुग्णांना प्रत्येक वेळी बांबोळी वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात धाव घ्यावी लागते.

या प्रकारामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचा वाटेत जीव जाण्याचा धोका असतो, त्यामुळे फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात आधी सर्व सुविधा येत्या ऑगस्टपर्यंत न पुरवल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशारा विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

दरम्यान, यासंबंधी फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांना विचारले असता, फोंड्यातील पूर्वीचे जुने इस्पितळ पाडून त्याजागी भव्य इस्पितळ बांधण्यास रवी नाईक यांचाच पुढाकार आहे. आता या इस्पितळात काही गैरसोयी आहेत, त्या दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.

Ponda Hospital
Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

इस्पितळात सीटीस्कॅन तसेच रक्तपेढी व डॉक्टर नेमण्यासंबंधी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याकडे सातत्याने बोलणी झाली आहेत, त्यांनी या इस्पितळाला सध्या निवडणूक आचारसंहिता असल्याने आवश्‍यक कार्यवाही केली जाऊ शकत नाही, त्यामुळे निवडणूक झाल्यावर सुविधा उपलब्ध करण्यात येतील, अशी ग्वाही दिली असल्याचे रितेश नाईक यांनी सांगितले.

कुणीही कितीही अपप्रचार केला तरी फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ हे फोंडा तालुका तसेच लगतच्या इतर भागातील रुग्णांना वरदान ठरल्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com