डिचोली-साखळी रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे अपघात वाढले

दोन महिन्यात सात गुरे दगावली; उपायांची गरज
 loose animal
loose animalDaink Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोली-साखळी हमरस्त्यावर मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून या गुरांमुळे अपघातही घडत आहेत. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रासमोर तर गुरांचा मुक्तपणे संचार वाढला आहे. वाहतुकीस अडथळा आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या या मोकाट गुरांच्या समस्येकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याबद्दल वाहनचालक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

(Problem of loose animal in Bicholim Sanquelim road)

गेल्या दोन महिन्यांत डिचोली-साखळी रस्त्यावर अपघातात सात गुरांचे बळी गेले आहेत, तर काही गुरे जखमी झाली आहेत. गेल्या गुरुवारी सकाळी या रस्त्यावरील विठ्ठलापूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुभती गाय गंभीर जखमी होण्याची घटना घडली. स्थानिक पंच ज्ञानेश्वर बाले आणि अन्य युवकांच्या मदतीने जखमी गायीची सिकेरी-मये येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली.

आरोग्य केंद्रासमोर अडथळा

डिचोली-साखळी हमरस्त्यावरील कारापूर-तिस्क ते व्हाळशी आयटीआयपर्यंत तर गुरांची मोठी समस्या आहे. विविध ठिकाणी ही मोकाट गुरे मुक्तपणे संचार किंवा रस्त्यावर ठाण मांडून असतात. रात्रीच्यावेळी तर गुरे हटकून रस्त्यावरच ठाण मांडतात. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रासमोर तर मोकाट गुरांची समस्या गंभीर बनत चालली आहे.

 loose animal
Bicholim Rain: डिचोलीत पावसाचा कहर सुरूच

कळपाने गुरे आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडून असतात. त्यामुळे वाहने आत-बाहेर घेताना अडथळा निर्माण होत असते. या मोकाट गुरांमुळे काहीवेळा आपत्कालीन उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका आणि अन्य वाहनेही अडकून पडतात. यामुळे एखादेवेळी आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 loose animal
Goa News | कळंगुट बीचवर पर्यटकांची गर्दी | Tourists rush at Calangute Beach | Gomantak Tv

पाच दिवसात पाच गुरांचा बळी

रस्त्यावर मुक्त संचार करणाऱ्या गुरांचा अंदाज येत नसल्याने बऱ्याचदा अपघातही घडत असतात. दीड महिन्यांपूर्वी व्हाळशी गृहनिर्माण वसाहत परिसरात सलग चार दिवसांत चार गुरे अपघातात बळी पडली होती, तर त्याच्या एक दिवस अगोदर शहरातील लाखेरे येथे एक म्हैस अपघातात मृत्यूमुखी पडली होती. सर्वण आणि कारापूर तिस्क येथेही मिळून अपघातात तीन गुरे दगावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com