Cash For Job Scam: प्रिया यादवला कोर्टाचा दणका; सुनावली सात दिवसांची पोलिस कोठडी!

Priya Yadav Police Custody: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या प्रिया यादवला न्यायालयाने मोठा दणका दिला.
Cash For Job Scam: प्रिया यादवला कोर्टाचा दणका; सुनावली सात दिवसांची पोलिस कोठडी!
CourtCanva
Published on
Updated on

रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने डिचोलीतील काही जणांना चुना लावलेल्या प्रिया यादव या महिलेला सात दिवसांची पोलिस कोठडी मंजूर झाली आहे. फसवणूक प्रकरणी कोल्हापूर येथून अटक केलेल्या प्रिया यादव या संशयित महिलेला आज (सोमवारी) पोलिसांनी रिमांडसाठी डिचोलीच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने प्रिया हिला सात दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. प्रियाकडून यावेळी 116 ग्रॅम सोन्यासह 4 वाहने जप्त करण्यात आली.

दरम्यान, प्रिया हिला अटक करताच पोलिसांनी तपासकामाला गती दिली आहे. प्रिया हिच्या मालकीच्या दोन कार मिळून पोलिसांनी चार वाहने आणि सुवर्णालंकार जप्त केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेल्या ऐवजाची किमत 27 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश पेडणेकर, पोलिस उपनिरीक्षक विवेश हडफडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने कारवाई करुन प्रिया यादव हिला अटक केली.

प्रिया यादव होती फरार

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरुन संशयित प्रियाने डिचोलीतील अनेकांना लाखो रुपयांची टोपी घालून ऑगस्ट महिन्यात पलायन केले होते. तिच्या विरोधात काहीजणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रियाने काही महिलांसह 20 हून अधिकजणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे सांगण्यात आले. ती लहान मुलीसमवेत डिचोलीत एका फ्लॅटमध्ये राहत होती. दोन महिन्यांहून अधिक काळ प्रिया फरार होती. अखेर डिचोली पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या.

Cash For Job Scam: प्रिया यादवला कोर्टाचा दणका; सुनावली सात दिवसांची पोलिस कोठडी!
Goa Job Scam: पूजा नाईकचे 'पॉलिटिकल कनेक्शन' समोर! 'मास्टरमाईंड' महिलेचा शोध सुरु; एका मुख्याध्यापिकेचाही सहभाग

‘मास्टरमाईंड’ पोलिसाचे निलंबन

प्रियाने काहीजणांकडून आपल्यासह मुलीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे उकळल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या कामात प्रियाला मदत केल्याच्या आरोपावरुन तसेच ‘मास्टरमाईंड’असल्याच्या संशयावरुन रोहन वेंझी या पोलिसाला निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com