Purple Fest In Goa: जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवात दिव्यांगासाठी काम करणाऱ्या ८ बिगर सरकारी संस्थांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. आणखीनही काही संस्था यात सहभागी होतील, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
त्यांनी या संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि बैठकीनंतर ही माहिती दिली. फळदेसाई म्हणाले, दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आयोजनात व्हावा यासाठी त्यांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार देशभरातून 8 संस्थांचे प्रतिनिधी आज आले होते. आणखीनही काही संस्थांशी संपर्क झाला असून त्याही संस्था या महोत्सवाच्या आयोजनात सहभागी होतील. सर्वांना सोबत घेऊन हा महोत्सव यशस्वी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी आजच्या बैठकीत नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत करावी, मदत कक्ष सर्वत्र असावेत, माध्यमांत दिव्यांगाविषयी कोणते शब्द वापरता येणार नाहीत याची माहिती देण्यासाठी कृतिसत्र घ्यावे अशा सूचना आल्याचे नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.