Goa Sport News: क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडणे नुकसानकारक- अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची खंत ः राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा सज्ज होत असल्याचा विश्‍वास
Anurag Thakur
Anurag ThakurDainik Gomantak

क्रीडा स्पर्धेचे वर्ष क्रीडापटूंसाठी खूप महत्त्वाचे असते. खेळाडूंसाठी स्पर्धा नियमित कालावधीत होणे आवश्यक असते, जेणेकरून त्यांना आपले कौशल्य प्रदर्शित करणे शक्य होते. ठरल्यानुसार स्पर्धा न होणे क्रीडापटूंसाठी नुकसानकारक असल्याची खंत व्यक्त करून केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अप्रत्यक्षरीत्या गोवा सरकारला टोला लगावला.

आता गोवा 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी ठरण्याचा विश्वासही केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केला.

वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेच्या अंतिम लढतींसाठी अनुराग यांनी रविवारी ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद इनडोअर स्टेडियममध्ये उपस्थिती लावली. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे शिष्टमंडळ सध्या गोव्यात तयारीची पाहणी करण्यासाठी आले आहे. ते आपला अहवाल सादर करतील. त्यानंतर पुढील निर्णय होईल.

गोव्यात ‘खेलो इंडिया’?

यावेळच्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे मध्य प्रदेशमध्ये सफल आयोजन झाले. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा मे महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये भव्य स्वरूपात होईल, अशी माहिती मंत्री ठाकूर यांनी दिली.

गोव्यात खेलो इंडिया स्पर्धा होऊ शकते का? या प्रश्‍नावर त्यांनी थेट उत्तर टाळले. मात्र, डब्ल्यूटीटी स्पर्धेद्वारे गोव्याने आयोजन क्षमता सिद्ध केल्याचे नमूद केले.

मंत्री ठाकूर म्हणाले, खेलो इंडिया क्रीडापटूंसाठी खूप मोठे व्यासपीठ ठरले आहे. प्रत्येक वेळी ही स्पर्धा वेगवेगळ्या राज्यात व्हावी हा आमचा प्रयत्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com