
महाराष्ट्र सर्कल टपाल विभागातर्फे 17 ऑगस्ट 2025 रोजी मडगाव रवींद्र भवन येथे विशेष टपाल साहित्याचे प्रकाशन गोव्याचे माननीय राज्यपाल पुसापती अशोक गजपथी राजू यांच्या हस्ते झाले. हे टपाल साहित्य स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार स्व. लक्ष्मीदास बोरकर यांच्या जन्मशताब्दी समाप्ती सोहळ्याच्या निमित्ताने प्रकाशित होत होते.
लक्ष्मीदास बोरकर यांचा राष्ट्रीय स्तरावर होत असलेला तो गौरव होता. या गौरव सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह हे हजर होते. गोव्याच्या सांस्कृतिक संगमाच्या इतिहासामुळे 'गोमंतकीय' या शब्दात एक विशेष ओळख रुजलेली आहे. पोर्तुगीजपूर्व काळ, शतकानुशतकांची पोर्तुगीज राजवट, स्थानिक परंपरा आणि भारतीय स्वातंत्र्यानंतरचे एकीकरण यांनी या 'गोमंतकीय'त्वाला आकार दिलेला आहे.
लक्ष्मीदास बोरकर हे या जटील परंतु आकर्षक ओळखीचे पाईक होते. त्यांचे जीवन त्यांच्या अस्मितेचा साक्षीदार होते. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्ववाने गोव्याच्या मुक्तीला हातभार लावला. आपला वैशिष्ट्यपूर्ण गोवा लोकशाही भारतात अधिक विकसित होऊ शकेल हे त्यांनी ओळखले होते. स्वातंत्र्यसैनिक असण्याबरोबरच ते जागृत पत्रकारही होते. त्यांच्या पत्रकारितेने परिवर्तनाच्या काळात गोव्याच्या आकांक्षा आणि आव्हानांना आवाज पुरवला. त्यांनी आपल्या लेखणीमधून या प्रदेशाची व्याख्या करणाऱ्या गोष्टींना आणि मूल्यांना जपले.
17 ऑगस्ट 2024 या दिवशी सुरू झालेल्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अनेक कार्यक्रम सादर झाले. गोव्याचे मानसशास्त्र मांडणाऱ्या त्यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आरंभीच्या कार्यक्रमात समाविष्ट होते. 1 ऑक्टोबर 24 रोजी लक्ष्मीदास बोरकर शताब्दी प्रश्नमंजुषा आयोजित केली गेली ज्यातून युवकांना आपल्या वारशाशी जोडले गेले. या उपक्रमामधून त्यांची सांस्कृतिक संरक्षक म्हणून त्यांची असलेली भूमिका अधोरेखित झाली.
त्यांच्या जन्मशताब्दी समाप्ती समारंभात गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यावरील दोन फिलॅटेलिक (टपाल साहित्य) फ्रेमद्वारे मी स्वतःच्या संग्रहातील टपाल साहित्य प्रदर्शित केले जे अनेक लोकांनी पाहिले तसेच याप्रसंगी लक्ष्मीदास बोरकर यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ज्ञानेश मोघे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दास-पर्व' या माहितीपटाचेही प्रदर्शन करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.