पर्वरी : गेल्या महिनाभरापासून मास्क घातलेल्या चोरांकडून घरफोडीच्या घटना वाढत असल्याने गोव्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोवा पोलिसांनी या घटनांची दखल घेत चोरट्यांविरोधात मोहीम राबवायला सुरूवात केली आहे. पोलिसांनी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील एकूण 19 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत 500 ग्राम सोनं जप्त केलं आहे.
पोलिसांनी बाणावलीतून मारिया सांताना बाप्टिस्टा (वय 44) आणि मडगावमधून त्याचा साथीदार मोहम्मद सुफियान (वय 20) या विद्यार्थ्याला अटक केली आहे. चौकशीत मारियाने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मारिया हा त्याचा साथीदार मोहम्मदसह मास्क लावून रात्रीच्यावेळी फिरायचा आणि घरफोडी कुठे करता येईल याचा अंदाज घ्यायचा. बंद घर दिसले की चोरी करायची, असा त्यांचा पॅटर्न होता. फेब्रुवारी 2024 पासून दोघेही चोरी करत फिरत होते. चोरी केलेलं सोने त्यांनी फिलिप राटोच्या मदतीने मडगावमधील समर पळ या सोनाराला विकले होते. पर्वरी पोलिसांनी चोरलेले सोने विकत घेणारा सोनार व्यावसायिक आणि फिलिप राटो यांना देखील ताब्यात घेतलं आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी मडगाव येथील दीपक बांदोडकर व समर पळ नावाच्या सोनारांकडून 442 ग्रॅम चोरीचे वितळलेलं सोनं जप्त केलं आहे. याशिवाय 100 ग्रॅम चोरीला गेलेल्या सोन्याचाही माग काढण्यात आलाय आणि लवकरच ते सोनं देखील जप्त करण्यात यश येईल, असा दावा पोलिसांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.