Car Stunt On Porvorim Road: कर्नाटकच्या ‘हिरो’ची गोव्यात स्टंटबाजी; व्हिडिओ व्हायरल

काही तासांत अटक : पर्वरी महामार्गावर गाडीचे दरवाजे उघडे ठेवून लोकांचा जीव टाकला धोक्यात
Car Stunt On Road
Car Stunt On RoadDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कधी काय पाहायला मिळेल याचा सध्या नेम लावणे अवघड बनले आहे. अलीकडे गोव्यात येणारे काही बेशिस्त पर्यटक सातत्याने भररस्त्यात गाड्यांची स्टंटबाजी करून वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजवत असल्याचे चित्र आहे.

रविवारी मध्यरात्री पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्गावर कारगाडीचे तीन दरवाजे उघडे ठेवून स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओची दखल घेत पर्वरी पोलिसांनी सोमवारी संशयित कारचालकास अटक केली.

या स्टंटबाजी प्रकरणी शिवानंदनगर, धारवाड - कर्नाटक येथील फाहिद हामजा (३७) या कारचालकास पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, तर कारमालकावर दंडात्मक कारवाई केली.

Car Stunt On Road
Panjim : मार्केटमधील गाळेधारकांचा भाडेकरार रखडल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान

रविवारी मध्यरात्री जीए - ०३ - सी - ९२०३ क्रमांकाच्या चारचाकी गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी गाडीचे तीन दरवाजे उघडे ठेवून मॉल दी गोवा ते ओ - कोकेरो सर्कलपर्यंतच्या मार्गावर ही कार बेदरकारपणे चालवली. ओ-कोकेरोच्या वाहतूक सिग्नलकडून वळसा घेतानासुद्धा या कारचे तिन्ही दरवाजे उघडेच होते. या वाहनाच्या मागून येणाऱ्या जागरूक प्रवाशांनी या स्टंटबाजीचा व्हिडिओ काढून तो माध्यमांच्या प्रतिनिधींना तसेच पोलिसांना पाठविला.

या व्हिडिओचे गांभीर्य लक्षात घेत पर्वरी पोलिसांनी निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे गाडी चालवून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालण्याचे कृत्य केल्याप्रकरणी कारचालकास अटक केली.

गोवा में सबकुछ नही चलता!

  • गोव्यात मौजमजेसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. यातील काही बेशिस्त पर्यटक गोव्यात काहीही चालते याच मानसिकतेतून वावरतात. काही मुजोर वाहनचालक बेदरकारपणे किंवा दारू पिऊन वाहने हाकून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालतात.

Car Stunt On Road
Mahanand Naik Goa: 16 महिलांची हत्या करणारा ‘दुपट्टा किलर’, गोव्यातला Serial Killer जो एका कॉलमुळे जाळ्यात अडकला
  • मध्यंतरी काही पर्यटक गाडीच्या टॉपवर बसून दारू पिऊन धिंगाणा घालताना किंवा गाडी समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जातानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

  • अनेकदा स्टंटबाजीच्या नादात कार वाळूत रुतल्यामुळे ती बाहेर काढताना पर्यटकांची नंतर चांगलीच दमछाक होताना पाहायला मिळाले आहे. अशा बेशिस्त व अतिउत्साही पर्यटकांमुळे गोवा सध्या वाईट बाबींसाठी प्रकाशझोतात येत आहे.

"आम्ही संशयित कारचालकास अटक केली, तर कारमालकावर दंडात्मक कारवाई केली. संशयित हा पर्यटक असून त्याने ही खासगी गाडी भाड्याने घेतली होती का? याची चौकशी सुरू आहे. याशिवाय हा कारचालक दारूच्या नशेत होता का? हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल."

- निधीन वाल्सन, पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com