Mapusa News : संविधानदिन महोत्सवाचे आयोजन

Mapusa News : २६ रोजी सकाळी १० वाजता आझाद भवन, पर्वरी येथे ‘संविधान दिन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
Indian Constitution
Indian Constitution Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News : म्हापसा, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवा आणि कला आणि संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव दिनानिमित्त रविवार, २६ रोजी सकाळी १० वाजता आझाद भवन, पर्वरी येथे ‘संविधान दिन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

या संविधान महोत्सव कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे तसेच समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, सन्माननीय पाहुणे म्हणून पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, पेडणे पालिकेचे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर,

प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापिका करुणा सातार्डेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष बाबलो आगरवाडेकर, प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गोवा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे,

भारतीय बौद्ध महासभा गोवा राज्याचे अध्यक्ष एस.के. जाधव, सावित्रीबाई फुले महिला मंडळ गोवा राज्याच्या अध्यक्ष वासंती परवार, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे कार्याध्यक्ष सखाराम कोरगावकर उपस्थित राहणार आहेत.

Indian Constitution
Film Festival Goa 2023 : इफ्फीची तयारी अजूनही अपूर्णच; सजावटीचे काही कामेही सुरू...

या संविधान महोत्सव कार्यक्रमात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवा या संघटनेच्या वतीने अनुसूचित जातीतील इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर आणि पदव्युत्तरमध्ये ६० टक्के व अधिक गुण घेऊन २०२३ साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी शनिवार, २५ रोजीपर्यंत गुणपत्रिका आणि आधार कार्ड पाठवावे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम

या संविधान महोत्सव कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात भीम गीतांवर एकल नृत्य आणि समूह नृत्य, भारतातील महान नेत्यांवर आधारित वेशभूषा कार्यक्रम, तसेच कराओके गायन आणि एकांकिका होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com